बालेवाडी : “याची देही याची डोळा” असा संगीतमय भजन स्पर्धेचा कार्यक्रम पुणेकरांना लवकरच बघायला मिळणार आहे. निमित्त आहे, भाजप शहर चिटणीस लहू बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा पुरूष आणि महिला या दोन्ही गटात पार पडणार असून पुणेकरांना भव्य भजन स्पर्धा पाहण्याची संधी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लहू बालवडकर सोशल वेलफेअरने उपलब्ध करून दिलीय. ३ जानेवारी ते ५ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेची अंतिम फेरी ६ जानेवारी रोजी होणार असून बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही त्याच दिवशी होणार आहे. त्यामुळे बालेवाडी-बाणेर औंध, सुस-म्हाळंगे, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी या परिसरातील जास्तीज जास्त भजनी मंडळांनी सहभाग घ्यावा, असं आव्हान लहू बालवडकर सोशल वेलफेअर तर्फे करण्यात आलं आहे.
हेही वाचा…आगामी निवडणुकीत भाजपकडून धक्कातंत्राचा वापर ; फडणवीसांनी नेत्यांना दिली ‘ही’ तंबी
विविध सामाजिक उपक्रमातुन सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर असणारे भाजपा युवा नेते लहू बालवडकर यांचा वाढदिवस सांप्रदायिक क्षेत्रांत भजनी मंडळांना चालना मिळावी या उद्देशाने लहू बालवडकर सोशल वेलफेअर वतीने भव्य व आगळी वेगळी स्पर्धा आयोजित केली आहे. परिसरातील जवळ पास १०० पेक्षा जास्त भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला आहे. मागच्या वर्षाप्रमाणे याही वर्षी लोकांची तुफान गर्दी बघायला मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा..“मुथरेत श्रीकृष्ण मंदिर उभारावं,” नितेश राणेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे मागणी
भाजप नेते तसेच शहर चिटणीस लहू बालवडकर यांनी सांगितले की, परिसरातील नागरिकांची सेवा विविध उपक्रमातून करत असताना आपला वाढदिवस या वेळी सांप्रदायिक क्षेत्रातील नागरीकांसाठी भजन स्पर्धा आयोजित करून साजरा करणार आहे. आपल्या परीसरात भजनी मंडळे मोठया प्रमाणात असून त्यांना चालना मिळावी उत्साह वाढावा व हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतुने नियोजन बद्ध भव्य स्वरूपात आगळी वेगळी भजन स्पर्धा पुरुष आणि महिलांसाठी आयोजित केली आहे. जवळपास शंभर पेक्षा अधिक भजनी मंडळे या स्पर्धेत सहभागी होणार असून आपला परीसर टाळ मृदंगाच्या गजरात दमदमून जाईल. प्रत्येक वर्षी सांप्रदायिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला जातो. इतून पुढे देखील अशा वेगवेगळ्या स्पर्धा सुरू ठेवून एक हक्काचे व्यासपीठ स्पर्धकांना उपलब्ध करून देणार आहे.
स्पर्धेची बक्षिसे आणि स्वरूप :
पहिले बक्षिस – ५१००० रूपये आणि सन्मानचिन्ह, श्रीरामजन्मभूमी मंदिर, अयोध्या प्रतिकृती
दुसरे बक्षिस – ४१००० रूपये आणि सन्मानचिन्ह, श्रीरामजन्मभूमी मंदिर, अयोध्या प्रतिकृती
तिसरे बक्षिस – ३१००० रूपये आणि सन्मानचिन्ह, श्रीरामजन्मभूमी मंदिर, अयोध्या प्रतिकृती
चौथे बक्षिस – २१००० रूपये आणि सन्मानचिन्ह, श्रीरामजन्मभूमी मंदिर, अयोध्या प्रतिकृती
पाचवे बक्षिस – ११००० रूपये आणि सन्मानचिन्ह, श्रीरामजन्मभूमी मंदिर, अयोध्या प्रतिकृती
वैयक्तिक बक्षिसे :
उत्कृष्ट गायन – ७५०० रुपये आणि सन्मानचिन्ह
उत्कृष्ट मृदंगवादन – ७५०० रुपये आणि सन्मानचिन्ह
उत्कृष्ट हार्मोनियम – ७५०० रुपये आणि सन्मानचिन्ह
इतर ५ आकर्षक बक्षिसे प्रत्येकी ५५५५ रुपये
सहभागी होणाऱ्या प्रत्येक भजनी मंडळास आकर्षक भेटवस्तू आणि येण्या जाण्याचा खर्च दिला जाणार आहे.
स्पर्धेचे स्वरुप :
३/४/५ जानेवारी रोजी प्राथमिक फेरी होईल
स्थळ – विठ्ठल रुक्मिणी मंदिर बालेवाडी .
महा अंतिम फेरी ६ जानेवारी रोजी
स्थळ : सर्व्हे नंबर १९/१/१ बाणेर – बालेवाडी रोड, कम्फर्ट झोन सोसायटी समोर, बालेवाडी पुणे – ४५
READ ALSO :
हेही वाचा…हे तीन चेहरे डोक्यात साठवून ठेवा.! IIT BHU मधील सामूहिक ब’ला’त्का’र प्रकरण, तिन्ही आरोपी भाजपा आयटी सेलचे सदस्य
हेही वाचा.रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभेवर भाजपचा डोळा ; भाजप ‘या’ कॅबिनेट मंत्र्याला मैदानात उतरवण्याच्या तयारीत
हेही वाचा..राष्ट्रवादीतल्या सासऱ्यावर भाजपमधील सून भारी पडणार का? ; ‘या’ लोकसभा मतदारसंघात निवडणूक गाजणार
हेही वाचा..“पुर्वी मंबाजी, तुंबाजी होते, आताच्या काळात मिटकरी आहेत”, शरद पवार गटाने मिटकरींना डिवचलं
हेही वाचा…महायुतीत जागांचा पेच वाढला, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने ‘या’ जागांवर दावा सांगितला