मुंबई : राष्ट्रवादी पक्ष फुटीच्या आधी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी भाजपच्या विरोधात कडवी वक्तव्ये करीत होते. परंतु आता अजित पवार गट महायुती सामील झाल्याने मिटकरींचा भूमिका सौम्य झाल्याचं दिसून येत आहे. परंतु त्याउलट मिटकरी आता शरद पवार गटांवर जोरदार टिका करतांना दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मिटकरींना शरद पवार गटाकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्रातला युवा आता थंड बसणार नाय,”आणखी एक प्रकल्प गुजरातला पळवला, पवारांची सरकारवर जोरदार टिका
अमोल मिटकरी यांनी टिका केल्यानंतर शरद पवार गटाकडून त्यावर लगेचच प्रत्युत्तर दिला जात आहे. मागील काही दिवसापासून मिटकरी आणि शरद पवार गटात जोरदार शाब्दिक टोलेबाजी बघायला मिळाली. यातच आता शरद पवार गटाचे पुण्याचे शहाराध्यक्ष प्रशांग जगताप यांनी मिटकरी यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. पुर्वी मंबाजी, तुंबाजी होते. स्वार्थासाठी सुलतानांपुढे लोटांगण घालणारे, महाराष्ट्र धर्म बुडवणारे. आताच्या काळात मिटकरी आहेत. असा जोरदार घणाघात प्रशांत जगताप यांनी केलाय.
हेही वाचा…खासदार अमोल कोल्हेंची ‘क्रेझ’ ओसरली? शेतकरी आक्रोश मोर्चाला प्रतिसाद मिळेना!
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकरी मोर्चा काढला होता. त्यावेळी देखील मिटकरी यांनी त्यावर खोचक टिप्पणी केली होती. त्यावर देखील शरद पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. त्यामुळे राष्ट्रवादीतल्या दोन्ही गटात आता दिवसेंदिवस राजकीय वैर वाढतच चाललंय आहे का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
पूर्वी मंबाजी, तुंबाजी होते… स्वार्थासाठी सुलतानांपुढे लोटांगण घालणारे, महाराष्ट्र धर्म बुडवणारे…
आताच्या काळात मिटकरी आहेत !— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) December 31, 2023
READ ALSO :
हेही वाचा…महायुतीत जागांचा पेच वाढला, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने ‘या’ जागांवर दावा सांगितला
हेही वाचा…आगामी निवडणुकीत भाजपकडून धक्कातंत्राचा वापर ; फडणवीसांनी नेत्यांना दिली ‘ही’ तंबी
हेही वाचा“मुथरेत श्रीकृष्ण मंदिर उभारावं,” नितेश राणेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे मागणी
हेही वाचा..“नववर्ष मावळतांना मावळची जागा आपली पाहिजे”, मावळ लोकसभेसाठी ठाकरे गटाचा नेता ठरला ?
हेही वाचा..आदित्य ठाकरेंचा कोल्हापुर दौरा, ‘या’ दोन ठिकाणी ठाकरेंची तोफ धडाडणार