कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने देखील कार्यक्रम जाहीर केला आहे. यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची कोल्हापुरात येत्या ९ आणि १० जानेवारीला सभा होणार आहे. अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी दिली आहे. कोल्हापुर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.
हेही वाचा…मग बाबरीचा ढाचा त्यांच्या वजनाने पडला असेल”, उद्धव ठाकरेंची फडणवीसांना कोपरखळी
आदित्य ठाकरे यांचा ९ जानेवारीला कोल्हापुर दौरा असून याठिकाणी त्यांच्या दोन जाहीर भा होणार आहे. शिवसेना झालेल्या बंडानंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने आणि कोल्हापुर लोकसभा मतदारसंघातील खासदार संजय मंडलिक यांनी ठाकरेंची साथ सोडली. आता याच मतदारसंघातील खासदार आम्ही कोणत्याही परिस्थितीत पाडू, असा विश्वास ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा…मोदींनी लोकसभा निवडणुकीचं बिगूल अयोध्यात वाजवलं ; हजारो कोटींच्या कामांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन
दरम्यान, महाविकास आघाडीच्या बैठकीत जागावाटप निश्चित करण्यात आलं आहे. यामुळे या दोन्ही जागा उद्धव ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाने या दोन्ही लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष केंद्रीत केलंय. त्याआधी एकनाथ शिंदे यांची तोफ देखील या दोन्ही मतदारसंघात धडाडणार आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यावेळी काय बोलणार? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“महाराष्ट्रातला युवा आता थंड बसणार नाय,”आणखी एक प्रकल्प गुजरातला पळवला, पवारांची सरकारवर जोरदार टिका
हेही वाचा…खासदार अमोल कोल्हेंची ‘क्रेझ’ ओसरली? शेतकरी आक्रोश मोर्चाला प्रतिसाद मिळेना!
हेही वाचा…सुनील केदारांचा पाय आणखी खोलात ; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला, कोर्टात झालेल्या सुनावणीत काय झालं?
हेही वाचा..संजोग वाघेरेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश ; अन् खासदार बारणे अन् राहुल कलाटे यांची झाली ‘राजकीय कोंडी’
हेही वाचामहाराष्ट्रातला आणखी एक प्रकल्प गुजरात सरकारने पळवला ; काॅंग्रेसची सरकारवर जोरदार टिका