नागपूर : नागपुर जिल्हा सहकारी बॅंक घोटाळ्याप्रकरणी काॅंग्रेसच्या आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहे. सुनील केदार यांना अटक केल्यानंतर त्यांनी जामीनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. परंतु सुनील केदार यांना कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सुनील केदार यांना जामीन आणि शिक्षेला स्थगिती नाकारली आहे. जामीनासाठी आणि शिक्षेला स्थगिती देण्यासाठी सुनील केदार यांनी अर्ज केला होतो.
हेही वाचा..शिवसेनेच्या सर्व वाघांनो तुमचं मातोश्री स्वागत ; अजित पवारांचा खंदा समर्थक ठाकरे गटात सामील
नागपुर जिल्हा सहकारी बॅंक घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेल्या सुनील केदार यांना जामीन अर्ज आणि शिक्षेला स्थगिती देणारा अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. नागपुर कोर्टात आज याप्रकरणाबाबत सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने असं म्हटलं आहे की, हे प्रकरण लोकांच्या पैशांची संबंधित आहे. आरबीआय आणि सेबीच्या नियमानुसार ही केस दाखल झाली आहे. त्यामुळे सुनील केदार यांना फिल्डवर सोडणे चुकीचे ठरेल, असं कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे सुनील केदार यांचे वकिल वरच्या न्यायालयात याची दाद मागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“२०२४ च्या पोटात काय दडलंय?” शिंदे गटासोबतच्या युतीसंदर्भात मनसेची मोठी प्रतिक्रिया
दरम्यान, नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा प्रकरणी पाच वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर आता सुनील केदारांचा प्रभाव कमी करण्याचा भाजपकडून प्रयत्न केला जात आहे. सुनील केदारांचा नागपुर शहासह ग्रामिण भागात चांगलचं वचर्स्व आहे. पुढील निवडणुका लढणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह आहेतच. परंतु आता केदार राजकीयदृष्ट्या अडचणीत आल्याची संधी साधून राज्यकर्ते त्यांच्या गटाला सहकारी संस्थांमधील विविध प्रकरणात घेरण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा..संजोग वाघेरेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश ; अन् खासदार बारणे अन् राहुल कलाटे यांची झाली ‘राजकीय कोंडी’
हेही वाचामहाराष्ट्रातला आणखी एक प्रकल्प गुजरात सरकारने पळवला ; काॅंग्रेसची सरकारवर जोरदार टिका
हेही वाचा“मग बाबरीचा ढाचा त्यांच्या वजनाने पडला असेल”, उद्धव ठाकरेंची फडणवीसांना कोपरखळी
हेही वाचा…मोदींनी लोकसभा निवडणुकीचं बिगूल अयोध्यात वाजवलं ; हजारो कोटींच्या कामांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला फुशारक्या मारू नये,” उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर जोरदार घणाघात