मुंबई : अलिकडच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जवळीक आणखीच वाढली आहे. अनेकदा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांच्या भेटीगाठी घेतांना दिसत आहेत. यातच राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यासोबत फेब्रुवारी महिन्यात एकत्रित येतील, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. याच्या चर्चा देखील मागील काही दिवसापांसून राज्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता मनसेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना १५ कोटी रूपयांच्या ८० गाड्या नेमक्या कशासाठी? अजित पवार गटाने दिलं ‘हे’ उत्तर
शिवसेना शिंदे गट आणि मनसेच्या युतीबाबत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी भाष्य केलं आहे. राज ठाकरे मराठी माणसाच्या हिताचा निर्णय घेतील. राज कारणात कधी काय होईल? हे काही आज सांगता येणार नाही. २०२४ च्या पोटात काय दडलंय? हे कोणाला माहिती नाही. पण यासंदर्भातील जो काही निर्णय असेल तो राज ठाकरे योग्य वेळी घेतील. तो महाराष्ट्राचा हिताचा असेल, हिंदुत्वाच्या हिताचा असेल आणि मराठी माणसाच्या हिताचा असेल,असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“फक्त पक्ष अन् लोकांची घरं फोडण्याचं काम भाजपने केलंय, “सुप्रिया सुळेंचा भाजपवर आक्रोश
मुळात हा विषय असा आहे की आताचे मुख्यमंत्री येऊन भेटतात तरी, आधीचे जे मुख्यमंत्री होते, ते भेटायचेच नाही कोणाला. जे काही महाराष्टाचे प्रश्न असतील, जनतेचे प्रश्न असतील, ते सन्मानिय राज ठाकरे मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातात. त्याच्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळतो, मार्ग निघतो. शेवटी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठीच आपण सर्वजण राजकारणात आलो आहोत. त्यामुळे ती गोष्ट करण्यासाठी भेट होत असेल तर त्यात वावगं नाही. असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…संतापजनक…! भाजप नेत्याचा अल्पवयीन मुलीवर ब’ला’त्का’र ; भाजपच्या राज्यात मुली सुरक्षित आहेत का?
हेही वाचा…“..म्हणून वाघाला पिंजऱ्याच्या आडून गुरगुरावं लागतं”, अमोल कोल्हेंचा अजित पवारांना अप्रत्यक्ष खोचक टोला
हेही वाचा…“मी बाजारू विचारवंत किंवा धंदेवाईक कार्यकर्ता नाही”, म्हणून.. मिटकरींना त्यांच्याच भाषेत शरद पवार गटाने सुनावलं
हेही वाचा…“मी बाजारू विचारवंत किंवा धंदेवाईक कार्यकर्ता नाही”, म्हणून.. मिटकरींना त्यांच्याच भाषेत शरद पवार गटाने सुनावलं
हेही वाचा…“शीतल म्हात्रे तुझं चिचुंद्रीसारखं तोंड बंद ठेव नाहीतर..”, शीतल म्हात्रेंना सुप्रिया सुळेंवरील टीका भोवली