मुंबई : मनात राम असेल तर ते फडणवीसांनी सांगण्याची गरज काय? राम मंदिर नसतानाही लाखो भाविक आयोध्येत जातच होते. जाणं-न जाणं यात राजकारणाचा भाग नाही, त्यामुळे यांनी फुशारक्या मारू नये. शिवसेनाप्रमुखांबद्दल, शिवसेनेच्या योदानाबद्दल हे बोलू शकतात म्हणेजच यांची मानसिकता कशी आहे लोकांना कळतेय. देवेंद्र फडणवीसांनीच त्यांच्या ढोंगीपणाचा बुरखा स्वत: हून उतरवला. असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात केला.
हेही वाचा…“मी बाजारू विचारवंत किंवा धंदेवाईक कार्यकर्ता नाही”, म्हणून.. मिटकरींना त्यांच्याच भाषेत शरद पवार गटाने सुनावलं
राष्ट्रवादीचे माजी महापौर आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे यांनी आज मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, राम मंदिर उद्घाटनाचं ‘पोलिटीकल इवेंट’ होऊ नये, हीच माझी अपेक्षा आहे. बाकी आम्हा सगळ्यांना आणि हिंदूंना आनंद झाला आहे. मी मुख्यमंत्री असताना, त्यापूर्वीही आयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे, त्यामुळे आयोध्येत जाऊन कधीही दर्शन घेईन. इतर कुणी दिले असतील, पण शिवसेनेनं त्या मंदिरासाठी पक्षनिधीतून ₹ १ करोडचा सहयोग दिला आहे.आम्हाला वाटलं होतं, युतीचं सरकार आल्यानंतर खास कायदा करुन राम मंदिर बांधण्यात येईल, पण तसं झालं नाही. सर्वोच्च न्यायालयानं तो निर्णय दिला.
हेही वाचा…“शीतल म्हात्रे तुझं चिचुंद्रीसारखं तोंड बंद ठेव नाहीतर..”, शीतल म्हात्रेंना सुप्रिया सुळेंवरील टीका भोवली
राममंदिरासाठी अनेक शिवसैनिक-कारसेवकांनी रक्त साडंलेलं आहे. कोणी का करत असलं, तरी राम मंदिर होतंय ह्याचा मला आनंद आहे.शिवसेनाप्रमुख ह्यांनी राममंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून त्यांचा मतदानाचा अधिकार हिसकावून घेतलाआयोध्येमध्ये राममंदिर होणं ही आनंदाची गोष्ट. त्याच्यासाठी शिवसेनेनं खूप मोठा संघर्ष केला आहे. सत्ता नसताना सत्ता आणण्याच्या जिद्दीने तुम्ही इथं आलात. काही सत्ता टिकवण्याच्या लाचारीसाठी तिकडे गेले. स्वाभिमानी आणि गद्दारीतला हा फरक आहे. घाऊक आहेत त्यांना खोक्यामध्ये बंद करण्याची आवश्यकता आहे. जे संवेदनशील आहेत, ते निष्ठेनं भगव्यासोबत आहेत.
READ ALSO :
हेही वाचाशिवसेनेच्या सर्व वाघांनो तुमचं मातोश्री स्वागत ; अजित पवारांचा खंदा समर्थक ठाकरे गटात सामील
हेही वाचा…“२०२४ च्या पोटात काय दडलंय?” शिंदे गटासोबतच्या युतीसंदर्भात मनसेची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…संतापजनक…! भाजप नेत्याचा अल्पवयीन मुलीवर ब’ला’त्का’र ; भाजपच्या राज्यात मुली सुरक्षित आहेत का?
हेही वाचा…“..म्हणून वाघाला पिंजऱ्याच्या आडून गुरगुरावं लागतं”, अमोल कोल्हेंचा अजित पवारांना अप्रत्यक्ष खोचक टोला
हेही वाचा…“मी बाजारू विचारवंत किंवा धंदेवाईक कार्यकर्ता नाही”, म्हणून.. मिटकरींना त्यांच्याच भाषेत शरद पवार गटाने सुनावलं