पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत विविध विकासकामाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी अयोध्या रेल्वेचे उद्घाटन, आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन देखील केलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी जवळपास १६ किलोमीटर रोड शो करत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यातच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी रोजी अयोध्या राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्रीकृष्णाचे मंदिरही व्हावं, अशी मागणी भाजप नेते नितेश राणे यांनी मोदींकडे केली आहे.
हेही वाचा..संजोग वाघेरेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश ; अन् खासदार बारणे अन् राहुल कलाटे यांची झाली ‘राजकीय कोंडी’
येणारे २०२४ वर्ष हे हिंदू राष्ट्र म्हणून आपल्या भारतासाठी फार महत्वाचे आहे. कारण याची सुरूवात राम मंदिर निर्मानाने होणार आहे. मथुरामध्ये ही श्रीकृष्णाचे मंदिर व्हावं आणि हिंदू समाजावर येणारे प्रत्येक संकट दुर व्हावं. यासाठी जे प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून वर्षभरात करेन, नवीन वर्षासाठी हा संकल्प सोडला आहे. असे भाजप नेते नितेश राणे यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…महाराष्ट्रातला आणखी एक प्रकल्प गुजरात सरकारने पळवला ; काॅंग्रेसची सरकारवर जोरदार टिका
दरम्यान, अयोध्या नगरीतील मुख्य महामार्ग आणि प्रमुख चौकाला वंदनीय हिंदू ह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या, अशी मागणी मनसेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केलीय.
READ ALSO :
हेही वाचा..“नववर्ष मावळतांना मावळची जागा आपली पाहिजे”, मावळ लोकसभेसाठी ठाकरे गटाचा नेता ठरला ?
हेही वाचा..आदित्य ठाकरेंचा कोल्हापुर दौरा, ‘या’ दोन ठिकाणी ठाकरेंची तोफ धडाडणार
हेही वाचा…“महाराष्ट्रातला युवा आता थंड बसणार नाय,”आणखी एक प्रकल्प गुजरातला पळवला, पवारांची सरकारवर जोरदार टिका
हेही वाचा…खासदार अमोल कोल्हेंची ‘क्रेझ’ ओसरली? शेतकरी आक्रोश मोर्चाला प्रतिसाद मिळेना!
हेही वाचा…सुनील केदारांचा पाय आणखी खोलात ; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला, कोर्टात झालेल्या सुनावणीत काय झालं?