मुंबई : ज्या पद्धतीने सत्ताधारी बारामतीबाबत प्रेम आणि उत्सुकता दाखवतात त्याचे मी मनापासून स्वागत करते, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज लगावला. माझा संविधानावर विश्वास आहे. संविधानानुसार प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कोणी बारामतीला गेले तर त्यात काही गैर नसल्याचे सुप्रियाताई म्हणाल्या. २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार जिंकेल, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. त्यावर आज सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथे माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
“जसा भाजीपाला विकत घेतला जातो, तसा भाजप आमदार विकत घेताहेत”
विद्यार्थ्यांना आयआयटी, आयआयएममध्ये ॲडमिशन हवे असते कारण त्या उत्तम शैक्षणिक संस्था आहेत. त्याप्रमाणेच बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशातील खूप विकसित लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. बारामतीच्या जनतेने खूप कष्ट करून हा मतदार संघ विकसित केला आहे. त्यासाठी अनेकांनी त्याग केला आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघ हवासा वाटणे यात काही गैर नाही कारण प्रत्येकाला चांगलीच गोष्ट हवी असते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“नवनीत राणा ह्या भाजप अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अंधभक्त”
अलिकडेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीचा दौरा केला. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीचा राष्ट्रवादीचा गड उध्दवस्त करू असा दावा बावनकुळे यांनी केला. त्यावरून राज्यात बारामती मतदारसंघाचा मुद्दा उपस्थित झाला होता. तसेच बारामती मतदार संघ जिंकण्यासाठी भाजप सध्या जोरदार प्रयत्न करीत आहेत. केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण देखील बारामती मतदार संघाच्या दौऱ्यावर येणार असून बावनकुळेंनी त्या दौऱ्याचा आढावा देखील यावेळी घेतला आहे.
Read also
- “तेव्हा उद्धव ठाकरे अन् आघाडी सरकार झोपा काढत होते का ?” मनसेचा सवाल
- “तेव्हा याकुब मेमनची कबर सजवत बसले अन् आता म्हणे माझ्या बापाच्या नावाने मतं मागू नका”
- वरळीत घेरण्याचा भाजपचा प्रयत्न, आदित्य ठाकरे म्हणाले, “फुटबॉलच्या मैदानात नेहमी रोनाल्डाच घेरण्याचा प्रयत्न केला जातो”
- याकुब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरणावरून नवा वाद; अजित पवारांना प्रश्न विचारताच म्हणाले, “तु मुख्यमंत्री असता तर..;”
- “भट्टीतील कोळसा सावंतांनी कुंभकर्णी झोपेत असलेल्या स्वत: च्या नेतृत्वाला जागे करण्याची गरज”