मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आतापर्यंत किती प्रयोग झाले? रोज सरड्यासारखा रंग बदलणारे आणि इव्हेंट मॅनेटमेंट करणारी ही माणसे आहेत. आज मोंदीसारखा कारभार नाही, उद्या मोदींच्या राज्यात भ्रष्टाचार, शरद पवारांसारखे नेतृत्व नाही. त्यानंतर शरद पवार भ्रष्टाचारी, रोज विचार बदलतात, त्यामुळे ती आंधी नाही वैगेर नाही. जनता आंधी निर्माण करू शकते पक्ष नाही अशी टिका शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. त्याला आता मनसेने प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊतांची तुरूंगातून सुटका कधी होईल ? कार्यकर्त्यांना चिंता, कोठडीतला मुक्काम आणखी वाढला
मनसेचे नेते गजानन काळे यांनी अरविंद सावंत यांचा खरपुस समाचार घेतला आहे. ते म्हणाले की भट्टीतील कोळसा अरविंद सावंत यांनी कुंभकर्णी झोपेत असलेल्या स्वत: च्या नेतृत्वाला जागे करण्याची जास्त गरज आहे. दुतोंडी सापाप्रमाणे नवाबसेना पक्षप्रमुख यांनी कोणा कोणाची छुपी मदत, युत्या आघाड्या करत नवाबसेनेचे दुकान चालवले आहे. याची महाराष्ट्राला कल्पना आहे. आमच्या नावाने शिमगा बंद करा असा इशारा देखील गजानन काळे यांनी सांवतांना दिला.
शिंदे गटाकडून ‘धनुष्यबाण’ गोठवण्याची मागणी; पेडणेकर म्हणाल्या, “कितीही काहीही करा, पण..;”
देशात संविधानावर घाला घातला जात आहे हे जनतेला कळतंय. देशाच्या घटनेवर घाव घालणारं काम देशात होतं आहे. भोंग्याबद्दल कुणी दखल घेऊ नये. किरीट सोमय्यांनी जेवढ्यांवर आरोप केले ते आज भाजपात आहे. मग इडी गप्प का? असा सवाल सावतांनी केला. नारायण राणे, एकनाथ शिंदे यांच्यावरील इडी कारवाईचं काय झालं? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
“आदित्य ठाकरेंची सभा बस स्टॅंड होती, तसेही बस स्टॅंडवर हजार पाचशे लोक जमतातच”; संदिपान भुमरे
दरम्यान, अलिकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे आणि आशिष शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. अशातच आगामी महापालिका निवडणुका मनसे आणि भाजप एकत्रित लढणार का ? अशा चर्चा देखील रंगू लागल्या आहेत. त्यावरच अरविंद सावंतांनी राज ठाकरेंना खोचक टोला हाणला.
Read also
- “जसा भाजीपाला विकत घेतला जातो, तसा भाजप आमदार विकत घेताहेत”
- “नवनीत राणा ह्या भाजप अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अंधभक्त”
- विजयादशमीला सेनेचे 10 नेते शिंदे गटात करणार सीमोल्लंघन..! खासदार, आमदार अन् माजी नगरसेवकांचा समावेश
- “मुंबईत, पुण्यात तसेच महाराष्ट्रभर आमचेच महापौर असणार”; भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा
- एकनाथ शिंदे नाना पाटेकरांच्या भेटीला..! म्हणाले, “नानांना भेटून आनंद झाला”