औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 12 सप्टेंबर रोजी पैठण दौऱ्यावर येणार आहेत. त्यांची याठिकाणी मोठी सभा देखील होणार आहे. कॅबिनेट मंत्री संदिपान भूमरे यांच्या मतदार संघातील हा दौरा खास व्हावा यासाठी जय्यत तयारी देखील सुरू असल्याचं संदिपान भूमरे यांनी सांगितलं आहे. तसेच त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावर देखील भाष्य़ केलं आहे.
“आमचे मिशन महाराष्ट्र, त्या मिशन अंतर्गत बारामती आहे;” देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी अनेक कार्यकर्त्यांनी मला भेटून चर्चा केली आहे. त्यामुळे ज्यावेळी मुख्यमंत्री येतील त्यावेळी अफाट गर्दी कार्यकर्त्यांची जमणार आहे. तसेच त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी रस्त्यावर म्हणजे गेस्ट हाऊस मध्ये सभा घेतली होती. कमी जागेत सभा घेतली तर कमी माणसं आली तरी ती जास्त वाटतंय. तसेच आमची सभा ही मैदान होणार असून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहे. असं म्हटलं आहेत.
“बापाचे नाव नसते तर एखाद्या स्टुडिओमध्ये फोटो काढत बसावे लागले असते”
तसेच पुढे बोलताना त्यांनी आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला. ते म्हणाले की आम्ही मैदानावर सभा घेणार असून त्यांनी बस स्टॅंडवर सभा घेतली होती. बसस्टॅंडवर कुणीही गेलं तरी पाचशे ते सहाशे लोक जमा होतात. त्यामुळे आता 12 तारखेला बघा किती गर्दी होते ती असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
“बारामतीच्या जनतेने ठरवलंय, यावेळी तुमचे ‘सुळे’ नक्की पाडणार”; राष्ट्रवादी-भाजपमध्ये खडाजंगी
एकनाथ शिंदे यांचा 12 तारखेला दौरा होणार असून त्यांचा हा दौरा दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. यासाठी रस्त्याची व्यवस्था, संवादाची व्यवस्था, तसेच बंदोबस्ताची व्यवस्था इतर सर्व बाबी प्रशासकीय आणि पोलीस प्रशासन करीत आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिली आहे.
Read also
- नितीश कुमारांनी घेतली शरद पवारांची भेट; दिल्लीत पंतप्रधानपदाबाबत खलबत्तं
- “सुरक्षारक्षकांचं ऐकणारं काॅंग्रेस नेतृत्व बहुदा थोरातांच ऐकत नसाव”; थोरातांना मनसेचे प्रत्युत्तर
- “राज ठाकरेंकडे पहिल्या सारखा लढाऊबाणा आता राहिलेला नाही”
- “बारामतीत सूर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल परंतु..;” जयंत पाटलांचा भाजपला टोला
- अजितदादांना एकनाथ शिंदेंची धास्ती ! ‘सीएम’चा ‘टीआरपी’वाढला : कार्यक्रम, सोहळ्यांसह भेटी-गाठींवर भर