नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबत युती तोडल्यानंतर आणि परत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. चार दिवसाच्या दिल्ली दौऱ्यात त्यांनी अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेटी घेतल्या आहेत. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील राजपथ येथील निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली.
“बापाचे नाव नसते तर एखाद्या स्टुडिओमध्ये फोटो काढत बसावे लागले असते”
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना एकजूठ करण्यासाठी नितीश कुमार सध्या विरोधकांच्या भेटी घेत आहेत. नितीश कुमार यांनी अगोदरच स्पष्ट केलं आहे की आगामी काळात होणाऱ्या लोकसभेत पंतप्रधान पदासाठी इच्छूक नाही परंतु भाजपला सत्तेपासून दूर राखण्यासाठी माझा सगळ्यांना पाठिंबा असणार आहे. तसेच विरोधकांना एकत्रित करणे माझा हेतु असणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
“बारामतीच्या जनतेने ठरवलंय, यावेळी तुमचे ‘सुळे’ नक्की पाडणार”; राष्ट्रवादी-भाजपमध्ये खडाजंगी
शरद पवार यांची भेट घेण्यापुर्वी नितीश कुमार यांनी काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव दीपाशंकर भट्टाचार्य यांची देखील त्यांनी भेट घेतली आहे. त्याआधीच शरद पवारांनी देखील स्पष्ट केलं आहे की पंतप्रधानपदासाठी उभा राहणार नसल्याचं त्यांनी देखील स्पष्ट केलं आहे.
Read also
- “सुरक्षारक्षकांचं ऐकणारं काॅंग्रेस नेतृत्व बहुदा थोरातांच ऐकत नसाव”; थोरातांना मनसेचे प्रत्युत्तर
- “राज ठाकरेंकडे पहिल्या सारखा लढाऊबाणा आता राहिलेला नाही”
- “बारामतीत सूर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल परंतु..;” जयंत पाटलांचा भाजपला टोला
- अजितदादांना एकनाथ शिंदेंची धास्ती ! ‘सीएम’चा ‘टीआरपी’वाढला : कार्यक्रम, सोहळ्यांसह भेटी-गाठींवर भर
- “आमचे मिशन महाराष्ट्र, त्या मिशन अंतर्गत बारामती आहे;” देवेंद्र फडणवीस