मुंबई : 1990 नंतर शरद पवार साहेबांचे नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही असे विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना उबगलं. त्यानंतर सातत्याने खोटेनाटे आरोप जे कधी सत्यात उतरले नाहीत. ते बेलगाम आणि बेफामपणे करण्यात आले. त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर कुठलाच परिणाम झाला नाही. बारामतीचा गड जिंकून दे असं साकडं बारामतीच्या मारूतीच्या देवळात जाऊन आज कुणीतरी घातलं. असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला. त्यावर आता भाजपने जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर दिलं आहे.
“तर मग श्रीलंकेतील राष्ट्रध्यक्षाप्रमाणे शरद पवारांना घर सोडून पळून जावं लागेल”; गोपीचंद पडळकर
बारामतीच्या जनतेने ठरवलं आहे, यावेळी तुमचे ‘सुळे’ नक्की पाडणार. शरद पवारांच्या घरासमोर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बूथ बैठक घेतली, भाजपची शाखा स्थापन केली. पहिल्याच दौऱ्यात एवढी आग लागली आहे, की धूर मुंब्र्यापर्यंत आला आहे. पिक्चर अभि बाकी हैं! असा इशारा देखील भाजपने राष्ट्रवादीला दिला आहे. त्यामुळे सध्या बारामतीवरून राजकीय पक्षांमध्ये जोरदार ख़डाजंगी बघायला मिळत आहे.
“माझी तर ममता बॅनर्जींशी ओळख होती, तिकडे कालीमातेच्या मंदिरात नेलं असतं”; उद्धव ठाकरे
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीच्या दौऱ्यावर असतांना अनेक ठिकाणी भेटी दिल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक मोठे मोठे गड उध्दवस्त केले तसेच बारामतीचा गड देखील येणाऱ्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उध्दवस्त करू असा दावा देखील त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. त्यावरून त्यांच्यावर राष्ट्रवादीकडून जोरदार शाब्दिक टिका टिप्पणी केली जात आहे.
“भास्कर जाधवांना आपण नेतेपद दिलंय, कारण आता आपल्याला लढायचं”; उद्धव ठाकरे
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा लोकसभेचा बारामती मतदार संघ सध्या राज्याच्या राजकारणाचा चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक शतके राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या बारामतीवर वचर्स्व मिळवण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करीत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामती दौऱ्यावर आहेत. केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण देखील बारामती दौऱ्यावर येणार असून त्यांच्याच दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी ते आले आहेत.
Mr. @Awhadspeaks , बारामतीच्या जनतेने ठरवलं आहे, यावेळी तुमचे ‘सुळे’ नक्की पाडणार.
शरद पवारांच्या घरासमोर प्रदेशाध्यक्ष श्री. @cbawankule जी यांनी बूथ बैठक घेतली, भाजपची शाखा स्थापन केली.
पहिल्याच दौऱ्यात एवढी आग लागली आहे, की धूर मुंब्र्यापर्यंत आला आहे.
पिक्चर अभि बाकी हैं! https://t.co/wf9tQBPHzP
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 7, 2022
Read also
- तारिख पे तारिख..! शिंदे गटाची कोर्टोत आता नवी मागणी, सुनावणी आणखी पुढं ढकलली
- “आधी फुटलेले तोंड सुधारा, अन् मग अस्मान दाखविण्याच्या वाफा सोडा”; उद्धव ठाकरेंना भाजपने डिवचलं
- “निर्मला सितारमण बिनटाक्याच्या ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर, कुणाला कळणार पण नाही”
- “मुख्यमंत्र्यांच्या नावे 5 दिवसात 500 पेक्षा अधिक गणपती बाप्पांचे दर्शन घेण्याचा विक्रम;”अजित पवार म्हणाले, कॅमेरा..;
- “बावनकुळे सोडा, लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखावरची धूळ पण उडणार नाही”