पुणे : बारामती लोकसभा मतदार संघ सध्या राज्याच्या राजकारणाचा मध्यबिंदू बनला आहे. सलग तीन वेळा खासदार राहिलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या ताब्यातील बारामती मतदारसंघावर भाजप डोळा ठेऊन राहिला आहे. सध्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामती दौऱ्यावर असून त्यांनी राष्ट्रवादीवर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीचे नेते देखील भाजपवर निशाणा साधताना दिसत आहेत. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस आज पुणे दौरे असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, आमचे मिशन महाराष्ट्र आहे, आमचे मिशन इंडिया आहे, बारामती महाराष्ट्रातच येतं. महाराष्ट्राबाहेर येत नाही. त्यामुळे मिशन महाराष्ट्राच्या अंतर्गत बारामती असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बारामतीवरून राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
“बावनकुळे सोडा, लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखावरची धूळ पण उडणार नाही”
शिंदे- ठाकरे यांच्या राजकीय संघर्षाबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा नवीन तारीख दिली आहे. त्यावर शिंदे गटाकडून धनुष्यबाण गोठवण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असताना त्यावर बोलणं उचित ठरणार नाही. तसेच एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना आमच्यासोबत आहे. असंही ते म्हणाले.
“तर मग श्रीलंकेतील राष्ट्रध्यक्षाप्रमाणे शरद पवारांना घर सोडून पळून जावं लागेल”; गोपीचंद पडळकर
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीच्या दौऱ्यावर असतांना अनेक ठिकाणी भेटी दिल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक मोठे मोठे गड उध्दवस्त केले तसेच बारामतीचा गड देखील येणाऱ्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उध्दवस्त करू असा दावा देखील त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. त्यावरून त्यांच्यावर राष्ट्रवादीकडून जोरदार शाब्दिक टिका टिप्पणी केली जात आहे.
Read also
- “बापाचे नाव नसते तर एखाद्या स्टुडिओमध्ये फोटो काढत बसावे लागले असते”
- “बारामतीच्या जनतेने ठरवलंय, यावेळी तुमचे ‘सुळे’ नक्की पाडणार”; राष्ट्रवादी-भाजपमध्ये खडाजंगी
- तारिख पे तारिख..! शिंदे गटाची कोर्टोत आता नवी मागणी, सुनावणी आणखी पुढं ढकलली
- “आधी फुटलेले तोंड सुधारा, अन् मग अस्मान दाखविण्याच्या वाफा सोडा”; उद्धव ठाकरेंना भाजपने डिवचलं
- “निर्मला सितारमण बिनटाक्याच्या ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर, कुणाला कळणार पण नाही”