अमरावती : शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यातील राजकीय संघर्ष सगळ्यांना माहिती आहे. मागील काही महिन्यापासून नवनीत राणा उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टिका करीत आहेत. अलिकडेच नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना तु ठाकरे है तो मैं भी राणा हुं असं म्हणत चुचकारलं होतं. त्याला आता हिंगोलीचे लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“आदित्य ठाकरेंची सभा बस स्टॅंड होती, तसेही बस स्टॅंडवर हजार पाचशे लोक जमतातच”; संदिपान भुमरे
उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करण्याची नवनीत राणांची लायकी नाही. शिवसेनेच्या नादाला लागल्यास येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्ही नवनीत राणांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा सुभाष वानखेडे यांनी दिला आहे. तसेच 2019 मधील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आशिर्वादाने नवनीत राणा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. असंही ते म्हणाले.
नितीश कुमारांनी घेतली शरद पवारांची भेट; दिल्लीत पंतप्रधानपदाबाबत खलबत्तं
नवनीत राणा या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंध भक्त आहेत. आगामी निवडणुकीत त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठीच राणांचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. नवनीत राणा या अज्ञानी आहेत. त्यांना कुठलाही अनुभव नाही, असा हल्लाबोल देखील त्यांनी केला आहे. त्याआधी मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. तुम्ही शिवसेनेचे असाल तर मी पण विदर्भाची सून आहे. आमचा सामना तर लवकरच होईलच. त्यात कळेल की कोण किती ताकदवान आहे. असा इशारा नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना दिला.
Read also
- विजयादशमीला सेनेचे 10 नेते शिंदे गटात करणार सीमोल्लंघन..! खासदार, आमदार अन् माजी नगरसेवकांचा समावेश
- “मुंबईत, पुण्यात तसेच महाराष्ट्रभर आमचेच महापौर असणार”; भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा
- एकनाथ शिंदे नाना पाटेकरांच्या भेटीला..! म्हणाले, “नानांना भेटून आनंद झाला”
- संजय राऊतांची तुरूंगातून सुटका कधी होईल ? कार्यकर्त्यांना चिंता, कोठडीतला मुक्काम आणखी वाढला
- शिंदे गटाकडून ‘धनुष्यबाण’ गोठवण्याची मागणी; पेडणेकर म्हणाल्या, “कितीही काहीही करा, पण..;”