पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी देखील भेटी दिल्या. तसेच प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांच्या सिंहगडाच्या पायथ्याची असलेल्या डोणजे गावात देखील त्यांनी भेट दिली आणि नाना पाटेकर यांच्या घरी स्थापन कऱण्यात आलेल्या गणपतीचं देखील त्यांनी दर्शन घेतलं.
“राज ठाकरेंकडे पहिल्या सारखा लढाऊबाणा आता राहिलेला नाही”
नाना पाटेकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरी स्थापना करण्यात आलेल्या गणरायाचे दर्शन घेतलं. यावेळी नाना पाटेकर यांच्यासोबत विविध विषयांवर गप्पाही रंगल्या असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवादरम्यान गेल्या 5 दिवसात 500 पेक्षा अधिक गणपती बाप्पांचे दर्शन घेण्याचा विक्रम केला आहे. यातले बहुतांश बाप्पा हे मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरातील असून मुख्यमंत्री अगदी पहाटेपर्यंत दर्शन घेत फिरत होते. असं मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात येत आहे. यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टिका केली आहे.
“बारामतीत सूर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल परंतु..;” जयंत पाटलांचा भाजपला टोला
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अगदी कमी कालावधीत एकनाथ शिंदे विविध मुद्दांवरून प्रसिद्धीच्या झोकात आले. प्रत्येक कार्यकर्त्यांना भेटण्याचा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर चंगच बांधला. आता गणेशोत्सव दरम्यान देखील ते प्रत्येकाच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहेत. यावरून मुख्यमंत्र्यांच्या गणेश दर्शनाच्या चित्रफिती समाज माध्यावर आहेत. या दर्शन यात्रेवर अजित पवारांनी टिका केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री सण आल्यावर कसे काय सक्रिय होतात, आम्ही पण दर्शन घेतो पण कॅमेरा लावत नाहीत. असा शाब्दिक टोला अजित पवारांनी हाणला.
अजितदादांना एकनाथ शिंदेंची धास्ती ! ‘सीएम’चा ‘टीआरपी’वाढला : कार्यक्रम, सोहळ्यांसह भेटी-गाठींवर भर
मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. अलिकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील वर्षा बंगल्यावर येऊन गणपत्ती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. त्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी देखील वर्षा बंगल्यावर आले. अशातच काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या.
अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते @nanagpatekar यांच्या सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील घरी उपस्थित राहून त्यांच्या घरी स्थापना करण्यात आलेल्या श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी नाना पाटेकर यांच्यासोबत विविध विषयांवर गप्पाही रंगल्या. pic.twitter.com/b4BsXBgMFd
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 7, 2022
Read also
- संजय राऊतांची तुरूंगातून सुटका कधी होईल ? कार्यकर्त्यांना चिंता, कोठडीतला मुक्काम आणखी वाढला
- शिंदे गटाकडून ‘धनुष्यबाण’ गोठवण्याची मागणी; पेडणेकर म्हणाल्या, “कितीही काहीही करा, पण..;”
- “आदित्य ठाकरेंची सभा बस स्टॅंड होती, तसेही बस स्टॅंडवर हजार पाचशे लोक जमतातच”; संदिपान भुमरे
- नितीश कुमारांनी घेतली शरद पवारांची भेट; दिल्लीत पंतप्रधानपदाबाबत खलबत्तं
- “सुरक्षारक्षकांचं ऐकणारं काॅंग्रेस नेतृत्व बहुदा थोरातांच ऐकत नसाव”; थोरातांना मनसेचे प्रत्युत्तर