IMPIMP

राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेदार्थ राज्यभर आंदोलन करणार : बाळासाहेब थोरात

 

मुंबई : हाथरास पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना अटक करण्यात आली आहे. कलम १८८ अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे.

युपी सरकारने राज्यात कलम १४४ लागू केल्याने राहुल गांधी पायी पीडितेच्या घरी जाण्यासाठी निघाले होते मात्र त्यांच्यासोबत असलेल्या जमावामुळे पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना अडवले यावेळी राहुल गांधींना पोलिसांनी जोरदार धक्काबुक्की केली. जमावाला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी पोलिसांनी लाठी हल्ला देखील केल्याचे समोर आले आहे.

पोलिसांकडून सुरु असलेल्या गळचेपीच्या विरोधात आणि राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यात आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महाविकास आघाडीटीचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

हाथरस पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जाणा-या राहुलजी व प्रियंकाजींना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की करत ताब्यात घेतले. या दडपशाहीच्या विरोधात राज्यभर आंदोलन करणार असून मी स्वत: थोड्याच वेळात मंत्रालयाजवळ महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करणार आहे असा एल्गार थोरात यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.