IMPIMP
Therefore, I had resigned from the NCP. Kesarkar's reply to Jitendra Awhad Therefore, I had resigned from the NCP. Kesarkar's reply to Jitendra Awhad

“त्यामुळे मी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता”; केसरकरांचं जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेतून बाहेर पडण्यास नारायण राणे आणि राज ठाकरे यांना शरद पवारांनी मदत केली असल्याचं वक्तव्य शिंदे गटातील प्रवक्ते दिपक केसरकर यांनी केलं आहे. त्यावरून आता दिपक केसरकर यांच्यावर राष्ट्रवादीकडून प्रखर शब्दात टिका केली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिपक केसरकरांना शाब्दिक हल्ला चढवला आहे. त्यावर आता दिपक केसरकरांनी शरद पवारांची माफी मागत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“फडणवीस राज ठाकरेंच्या घरी”; मंत्रिपदाबाबत राज ठाकरे म्हणाले की..; 

ज्या दिवशी जितेंद्र आव्हाडांनी असं लिहिलं आहे की की ते मला भेटायला आले होते. ते हेलिकॉप्टर घेऊन आले होते, ही वस्तुस्थिती आहे. नारायण राणेंच्या मुलाचा प्रचार करा, असं सांगायला आले होते. पवारांचा निरोप घेऊन ते आले नव्हते. पवार ज्यादिवशी सांवतवाडीला आले त्यावेळी मी माझा राजीनामा त्यांच्याकडे दिला.  मी राणेंचा प्रचार करू शकत नाही. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देतो असं त्यांना पत्र दिलं होतं. असं केसरकर म्हणाले.

“आम्ही आमचं सरकार मजबुतीने चालवतोय”; पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर 

मात्र शरद पवारांनी माझा राजीनामा स्विकारला नाही. पण ज्यावेळी ते सिंधुदुर्गमध्ये आले, त्यावेळी राष्ट्रवादीची मोठी सभा होती. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मी एकमेव आमदार त्याठिकाणी उपस्थित होतो. तसेच तिथे आव्हाड त्यांच्यासोबत होते. त्यांनी मला स्टेजवर येूऊ नका, असा निरोप दिला. त्यानंतर राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही चुकुन घडले असेल तर पवारांची दिलगिरी व्यक्त केली आहे. तरीही आवश्यकता असेल तर त्यांच्या घरी जाऊन दिलगिरी व्यक्त करेने असंही केसरकर म्हणाले.

“सध्या दोन जणांचे मंत्रीमंडळ असून दोघेच महाराष्ट्राचे मालक”; अजित पवारांचा खोचक टोला 

दरम्यान, दिपक केसरकरांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादीने हल्लाबोल केला होता. अहो केसरकर किती बोलता पवार साहेबांविरूद्ध एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठुन शिकलात. 2014 ला मीच आलो होतो साहेबांचा निरोप घेऊन, जिथे आहात तिथे सुखी रहा. खाजवून खरूज काढू नका, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं.

Read also