मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर आज भेट घेतली. यावेळी फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या तब्यतेची विचारपुस केली असल्याची माहिती समोर आली आहे. अलिकडेच सत्ता स्थापन केल्यानंतर राज ठाकरे यांनी देवेद्र फडणवीस यांना पत्र पाठवले होते. त्यानंतर राज ठाकरे यांच्या पत्राला पत्राद्वारे नाहीतर त्यांच्या घरी जाऊन उत्तर देईन, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
उद्धव ठाकरेंचा ऑगस्टपासून महाराष्ट्रात झंझावत दौरा! बंडखोरांना जोरदार प्रत्युत्तर देणार
गेल्या काही दिवसापासून राज ठाकरे यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. तसेच मुंबईत गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस पडत असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. मात्र यावेळी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्यतेची विचारपूस केल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसाचं राज ठाकरे यांच्या घरी औक्षण करत स्वागत करण्यात आलं.
उद्धव ठाकरेंना शिंदेंचा मोठा धक्का; औरंगाबादसह, उस्मानाबाद नामांतराला स्थगिती
नव्या सरकारमध्ये राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना स्थान देण्यात येण्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या होत्या. त्यावर राज ठाकरे यांनी या बातम्या खोट्या असल्याचं सांगितलं होतं. त्याचबरोबर आज देखील त्यांनी यावर बोलताना अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यावर आता शिक्कामार्तोब कऱण्यात आलं आहे.
“ज्या आमदारांना एकनाथ शिंदेंचा फोन जाईल, तो मंत्री बनेल”; अब्दुल सत्तरांचं सुचक वक्तव्य
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवेळी राज ठाकरे यांच्या पक्षातील एकमेव आमदार राजू पाटील यांनी भाजपच्या वतीने मतदान केलं होतं. कल्याण ग्रामीण येथील राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार आहेत. त्याआधी देखील मनसेने भाजपला पाठिंबा दिला होता.
Read also
- “आम्ही आमचं सरकार मजबुतीने चालवतोय”; पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
- “सध्या दोन जणांचे मंत्रीमंडळ असून दोघेच महाराष्ट्राचे मालक”; अजित पवारांचा खोचक टोला
- “..लवकरच शिल्लक यात्रा काढा”; मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला
- “उद्धव ठाकरेंनी घेतलेले चुकीचे निर्णय थांबवले जातील”; नामांतराच्या निर्णयावरून सत्तारांची प्रतिक्रिया
- “औरंगजेब सरकारचा नातेवाईक कधीपासून झाला? हे सरकार हिंदुत्वद्रोही, महाराष्ट्रद्रोही”