रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधूदुर्ग लोकसभेचे माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता राजकारणात मन रमनत नाही असं म्हणत निलेश राणे यांनी राजकारणातून बाहेर जात असल्याची घोषणा त्यांनी सोशल मीडियावरून केली आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! अजित पवारांच्या हेलिकॉप्टरला बिघाड, नियोजित कार्यक्रम केला रद्द
निलेश राणे यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्तक्षेपामुळे राजीनामा दिला असल्याची चर्चा एका बाजूला सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं निलेश राणे सुपूत्र आहेत. यातच रवींद्र चव्हाण सध्या त्याच मतदारसंघाचे पालकमंत्री आहेत. तसेच रत्नागिरी- सिंधूदुर्ग लोकसभाचेही तयारी करत असल्याची चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…“शिंदे गटाचा पुढच्या वर्षी दसरा मेळावा होणार नाही, केंद्रात अन् राज्यात शिवसेना सत्तेत राहणार”
निलेश राणे यांनी राजकारणातून सन्यास घेतल्यानंतर आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे पडत आहेत. कुडाळ नगरपरिषदेच्या नगरसेविका प्राजक्ता शिरवळकर आणि अभिजित गावडे यांनी कुडाळ नगरपरिषदेच्या नगरसेवकाचं काही वर्ष असतांनाच राजीनामा दिला आहे.
हेही वाचा…“दसरा मेळाव्याला येत असताना पदाधिकाऱ्यांच्या गाडीचा अपघात, एक ठार तर ३ जण गंभीर जखमी”
दरम्यान, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे. मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र! असं निलेश राणे यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…“तुमचा मतदारसंघ हा माझाच मानते,”पंकजा मुंडेंनी विधानसभा मतदारसंघ निवडला, ? सभेतूनच दिलं संकेत
हेही वाचा…“खडसे आडनावामूळे पक्षातून डावलण्याचा प्रयत्न केला जात असेल तर..,” भाजपच्या महिला खासदाराचा गंभीर आरोप
हेही वाचा…मराठा समाजाकडून शरद पवारांच्या गाड्यांचा अडवला ताफा, तरूणांची जोरदार घोषणाबाजी
हेही वाचा…“शरद पवारांचा एक काळ होता त्यावेळी गांभीर्याने..,”संघर्ष यात्रेतून रोहित पवारांचा हल्लाबोल
हेही वाचा…शिंदे गटाची जोरदार बॅनरबाजी, आझाद मैदानावर एकनाथ शिंदे काय बोलणार ?