हॅकर्सने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरवर मोठा हल्ला केल्या जगभरातील अनेक बड्या हस्तींचे अकाऊंट हॅक झाले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, डेमोक्रेटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बाइडेन, इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सारख्या मोठ्या व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर उद्योगपती एलन मस्क, जेफ बेजोस आणि बिल गेट्ससह अनेक उद्योगपतींचे अकाऊंट देखील हॅक झाले आहेत.
हॅक केलेल्या अकाऊंट्सवरुन पोस्ट करत त्यामध्ये बिटकॉइनमध्ये दान मागण्यात आले आहे. अनेक खोटे ट्विट करण्यात आले. बिटकॉइनच्या दुप्पट परत केले जातील. पोस्ट झाल्यानंतर काही मिनिटात हे ट्विट डिलीट झाले. पण या काळात हॅकर्सला शेकडो लोकांनी एक लाख डॉलर पेक्षा अधिकची रक्कम पाठवली. ट्विटरने म्हटले की, ही परिस्थिती आमच्यासाठी आव्हानात्मक होती. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचे काम आमची टीम करत आहे.