मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज करोना परिस्थिचा आढावा घेण्यासाठी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक बोलावली असली तरी या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंऐवजी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. पंतप्रधान मोदी आज दुपारी साडेचारच्या सुमारास सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
अवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त, पालकमंत्री मात्र राजकारणातच व्यस्त – चंद्रशेखर बावनकुळे
राज्यांमधील लसीकरण वाढवण्यासाठी आणखी लससाठी मिळावा आणि इतर औषधांबाबत यावेळी राज्यांकडून मागणी केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून केंद्र सरकार सुद्धा लसीकरणासंदर्भातील काही निर्देश देणार असल्याची तसेच निर्बंधांबद्दल या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीमध्ये पुन्हा निर्बंध कठोर करण्याबरोबरच देशभरामध्ये लॉकडाउन लावण्याच्या शक्यतेबद्दलही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या बैठकीमध्ये महाराष्ट्र सरकारच्यावतीने मुख्यमंत्र्यांऐवजी राज्याचे आरोग्यमंत्री सहभागी होणार आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय लिस्ट सोशल मीडियावर व्हायरल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणास्तव मागील काही आठवड्यांपासून घरुनच काम करत आहेत. अनेक बैठकींना ते ऑनलाइन माध्यमातून घरुनच हजेरी लावत आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनालाही मुख्यमंत्री अनुपस्थित असल्याचा मुद्दा चांगलाच गजला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली असून सध्या ते राज्याचा कारभार, महत्वाच्या आढावा बैठकींना घरुनच उपस्थिती लावतायत.
Read also:
- ‘नोटा’ पेक्षा कमी मत पडणाऱ्या पक्षाच्या प्रवक्त्याला तुम्ही महत्व तरी देता का? फडणवीसांचे प्रत्यूत्तर
- गोवा, यूपीत राष्ट्रवादीने एक एक आमदार धरून आणलेत; चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला
- पंतप्रधान मोदींच्या पंजाब प्रवासातील घटना ही घातपाताचाच प्रयत्न असल्याचे स्पष्ट
- महापौर पेडणेकरांच्या कंपनीला कोविड केंद्राचे १.९७ कोटींचे पेमेंट – किरीट सोमय्या
- महापालिका निवडणुकीसाठी मनसेनं कंबर कसली; औरंगाबादमध्ये आणखी दोन नव्या शाखांच उद्घाटन