पणजी : देशात आता ५ राज्यांमध्ये निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. मतदान जरी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होणार असलं तरी पाचही राज्यांच्या निवडणुकांचा निकाल हा १० मार्च रोजी लागणार आहे. या पाचही राज्यांच्या निवडणुकांसाठी राजकारण चांगलेच पेटलेले दिसत आहे.
पुणे महापालिका निवडणूक लांबणीवर पडण्याची जोरदार चर्चा…
भारतीय जनता पक्षाकडून गोवा राज्याची जबाबदारी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाकण्यात आली आहे. त्यातच शिवसेना देखील गोव्यात निवडणूक लढविणार असल्याने राजकारणाचा गुंता चांगलाच वाढलेला दिसत आहे.
अहमदनगरच्या पालकमंत्री पदी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव आघाडीवर..
महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही शिवसेनेने प्रवक्ते संजय राऊत यांना शाब्दिक दारूगोळा घेऊन पुढं पाठवलं आहे. संजय राऊतांनी देखील शैलीत गोव्यात शाब्दिक मारा सुरु केला आहे. संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना म्हटलं होतं की गोव्यात आमची कधी नोटांशी आहे. भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीत नोटांचा पाऊस पाडण्याचे काम सध्या सुरु आहे.
अवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त, पालकमंत्री मात्र राजकारणातच व्यस्त – चंद्रशेखर बावनकुळे
महाराष्ट्रातून नोटांच्या बॅगा गोव्यात पाठवल्या जात आहेत. मात्र तुमच्या तुमच्या नोटांशी आम्ही लढू, असे आव्हान देखील राऊतांनी दिले होते. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोव्यात राऊतांना कोणी ओळखतं तरी का ? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे. ज्यांच्या पक्षाला गोव्यात नोटापेक्षाही कमी मतं मिळतात त्या पक्षाच्या प्रवक्त्याला तुम्ही इतक महत्व का देता?. त्यांना नोटापेक्षा जास्त मते पडू द्या आणि मग नंतर त्यांची पत्रकार परिषद घ्या. शिवसेनेला गोव्याच्या राजकारणात महत्व न देण्याची भूमिका एकंदरीत फडणवीसांनी घेतली आहे.
Read also:
- गोवा, यूपीत राष्ट्रवादीने एक एक आमदार धरून आणलेत; चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला
- पंतप्रधान मोदींच्या पंजाब प्रवासातील घटना ही घातपाताचाच प्रयत्न असल्याचे स्पष्ट
- महापौर पेडणेकरांच्या कंपनीला कोविड केंद्राचे १.९७ कोटींचे पेमेंट – किरीट सोमय्या
- महापालिका निवडणुकीसाठी मनसेनं कंबर कसली; औरंगाबादमध्ये आणखी दोन नव्या शाखांच उद्घाटन
- पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय लिस्ट सोशल मीडियावर व्हायरल