पुणे : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अजित पवारांचा पिंपरी चिंचवडमध्ये पहिलाच दौरा आयोजित करण्यात आला होता. अजित पवारांनी वाकड, हिजवडी येथील खासगी कार्यक्रमाला हजेरी लावून फिती कापल्या. यातच राष्ट्रवादी कॅंग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या एका बक्षिस वितरण समारंभास उपस्थित राहिले. मात्र यावेळी सभागृहात निम्म्या खुर्च्या रिकाम्या दिसल्या. यावरून जिल्ह्यात एकच चर्चा सुरू झाली.
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ नेत्यांनी सुषमा अंधारेंना दिली धमकी, फडणवीसांचा उल्लेख करत अंधारेंचा जोरदार पलटवार
पिंपरी चिंचवडमधील ग.दि.मा नाट्यगृह्यात बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या नाट्यगृहाची क्षमता ८०० आहे. परंतु राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या स्पर्धेत शेकडो मंडळांनी सहभाग नोंदविला परंतु. बक्षीस समारंभाला त्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकल्ला म्हणून ओळखला जातो. तर दुसरीकडे नाट्यगृह निम्मे रिकामे असल्याचं निदर्शानास आले. यावरून राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांचं अपयश असून शहाराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या माथी लागलं असल्याचं आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…भाजप-मनसेची बारामतीत मोठी खेळी, सुप्रिया सुळेंची मतं खायला ‘या’ फायर ब्रॅंड नेत्याला उमेदवारी देणार ?
दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला आमदार अण्णा बनसोडे, शहाराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहाराध्यक्ष कविता आल्हाट, माजी आमदार विलास लांडे, माजी शहाराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, नाना काटे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…“४० मतदारसंघ, ४० प्रचारसभा अन् ४० नेत्यांची फौज,” भाजपने ‘या’ राज्यात आखली मोठी रणनिती
हेही वाचा…एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का तर ठाकरेंना मोठा दिलासा, राहुल नार्वेकरांनी घेतला मोठा निर्णय
हेही वाचा…“ड्रग्ज माफिया ललित पाटील त्यावेळी शिवसेनेचा नाशिक शहराचा प्रमुख होता,” फडणवीसांनी एक मोठा बॉम्ब फोडला
हेही वाचा…“बक्कळ कमाईचा डाव पुरता फसलाय,” कंत्राट भरतीचा जीआर शासनाकडून रद्द
हेही वाचा…Video..! “बाळासाहेबांची डरकाळी, ठाकरी बाणा,” शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टिझर पाहलात का ?