मुंबई : शिवसेना पक्ष फुटीनंतर मागच्या वर्षाप्रमाणे याही वर्षी दोन मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान मिळावं, यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार लढाई सुरू होती. दोन्ही गटाने यासाठी महापालिकेत अर्ज सादर केले होते. मात्र शिंदे गटाने माघार घेतल्याने ठाकरे गटाला मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. यातच आता शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होत असून त्याचा टिझर देखील जारी केला आहे.
हेही वाचा…आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय ‘या’ नेत्याला शिंदे गटात लागली लॉटरी, शिंदेंनी दिलं मोठं पद
शिवसेनेची स्थापना झाल्यापासून दसऱ्याच्या दिवशी शिवतीर्थावर मेळावा घेण्याची परंपरा बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली. त्यानंतर प्रत्येक दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेतला जातो. मात्र शिवसेनेत फुट पडल्यानंतर मागच्या वर्षी ठाकरे गटाने या मैदानावर मेळावा घेतला. तर शिंदे गटाचा मेळावा बीकेसीवर घेण्यात आला होता. मात्र यावर्षी शिंदे गटाचा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.
हेही वाचा…“..त्यामुळेच एकनाथ खडसेंना मंत्रीपदावरून दूर गेले,” उदय सामंतांचं मोठं विधान
शिवसेनेचं एकच तत्व, साहेबांचं हिंदूत्व, साहेबांचं शिष्यत्व. वंदनीय हिंदूह्यदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा. मंगळवार २४ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजता आझाद मैदान असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याचा टिझर जारी केला आहे. या टिझरमध्ये बाळासाहेबांचा आवाज देण्यात आला आहे.
शिवसेनेचं एकच तत्व, साहेबांचं हिंदुत्व, साहेबांचं शिष्यत्व !
वंदनीय #हिंदूहृदयसम्राट #शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा…#शिवसेना_दसरा_मेळावा
मंगळवार, २४ ऑक्टोबर २०२३ रोजी, सायंकाळी ५.०० वाजता.स्थळ – आझाद मैदान.
मुख्य मार्गदर्शक – मा.ना.श्री.एकनाथजी… pic.twitter.com/aNgsFBHI4o— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 20, 2023
READ ALSO :
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ नेत्यांनी सुषमा अंधारेंना दिली धमकी, फडणवीसांचा उल्लेख करत अंधारेंचा जोरदार पलटवार
हेही वाचा…भाजप-मनसेची बारामतीत मोठी खेळी, सुप्रिया सुळेंची मतं खायला ‘या’ फायर ब्रॅंड नेत्याला उमेदवारी देणार ?
हेही वाचा…कंत्राटी भरतीचा जीआर रद्द..! फडणवीसांची मोठी घोषणा, ठाकरे अन् पवारांवर केलेत गंभीर आरोप
हेही वाचा…अजित पवार गटातील नेत्यांसोबत वाकृयुद्ध, पण तरीही अजित पवारांनी रोहित पवारांचं ‘ते’ केलं काम
हेही वाचा…परळीत गुंडाराज..! राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांवर जीवघेणा ह’ल्ला, आरोपी फरार