पुणे : राष्ट्रावादी पक्ष फुटी प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सातत्याने अजित पवार गटावर आरोप-प्रत्यारोप करतांना दिसत आहेत. त्यावर रोहित पवारांना अजित पवार गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यांतर प्रथमच पुणे जिल्ह्याच्या नियोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीत रोहित पवारांनी मागणी करताच त्याला अजित पवारांनी लगेच मान्यता दिल्याने याची एकच चर्चा सुरू आहे. विशेष करून मंत्री दिलीप वळसे पाटील देखील त्याठिकाणी उपस्थित होते.
हेही वाचा…“कुठलाच ९६ कुळी मराठा कुणबी दाखला घेणार नाही”, नारायण राणेंच्या विधानानंतर वाद होण्याची शक्यता
जिल्हा नियोजन बैठकीत रोहित पवारांनी कुकडी कालवा व सीना पाण्यावरून मुद्दा उपस्थित केला. कमी दाबामुळे खरीप हंगामासाठी सोडलेल्या कुकडी डाव्या कालव्याच्या आवर्तनाचं पाणी कर्जत-जामखेड मतदारसंघातील काही गावांपर्यंत पोहचलं नसल्याचं रोहित पवारांनी सांगितले. तसेचं सिना धरणातील पाणी कमी झाल्याने कुकडी प्रकल्पातून भोसे खिंडीतून पाणी सोडण्याचीही गरज असल्याचं रोहित पवारांनी अजित पवारांना सांगितेल. तसेच या पार्श्वभूमीवर कुकडी प्रकल्पातून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी एकूण ३ आवर्तनाचं नियोजन कऱण्याची आणि सिना कालव्याचं योग्य नियोजन करण्यासाठी कुकडी प्रकल्पातून भोसेखिंड येथून पाणी सोडण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली.
हेही वाचा…ड्रग्ज प्रकरण..! “तुम्ही कुणाची चौकशी करणार, अगोदर तुम्हीच याचं उत्तर द्या, ?” अन् सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर पारा चढला
रोहित पवारांच्या मागणीनंतर कुकडी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत रोहित पवारांची मागणी मान्य केली. त्यानसुर कुकडीच्या पहिलं आवर्तन १ डिसेंबर रोजी होईल तर तिसऱ्या आवर्तनाबाबही सकारात्मक चर्चा झाली असून याबाबतची स्वतंत्र बैठक होणार आहे.
कुकडी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा पुण्याचे पालकमंत्री मा. अजितदादा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उपस्थित होतो. यावेळी माझ्या मतदारसंघातील कुकडी व सीनाच्या पाण्याचा मुद्दा लावून धरला. कमी दाबामुळं खरीप हंगामासाठी सोडलेल्या कुकडी डाव्या कालव्याच्या आवर्तनाचं पाणी… pic.twitter.com/JLs3TOqNZZ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 20, 2023
READ ALSO :
हेही वाचा…परळीत गुंडाराज..! राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांवर जीवघेणा ह’ल्ला, आरोपी फरार
हेही वाचा…आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय ‘या’ नेत्याला शिंदे गटात लागली लॉटरी, शिंदेंनी दिलं मोठं पद
हेही वाचा…“..त्यामुळेच एकनाथ खडसेंना मंत्रीपदावरून दूर गेले,” उदय सामंतांचं मोठं विधान
हेही वाचा…४५ वर्षापासून शिवसेनेत असलेली ”बाळासाहेबांची रणरागिणी” शिंदे गटात दाखल, शिंदेंनी दिलं थेट ‘नेते पद’
हेही वाचा…“शरद पवारांचा दहशतवाद्यांना पाठींबा आहे का? खुलासा करावा”, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची मागणी