मुंबई : शिवसेना पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना उतरती कळा लागली. अनेक निष्ठावंत आमदार, खासदार, कार्यकर्त्यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटातील प्रमुख महिला मीनाताई कांबळी यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना लगेच शिवसेनेचे नेते पद एकनाथ शिंदे यांनी दिले.
हेही वाचा…“आघाडीत वादावादी होईल, घासाघिस होईल, पण उमेदवार देऊ,” पृथ्वीराज चव्हाणांचं लोकसभेबाबत मोठं विधान
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेमध्ये गेली ४५ वर्ष मीनाताई कांबळी कार्यरत होत्या. आपल्या कामाच्या बळावर संघटनेत त्यांनी अनेक पदे भुषवली. बाळासाहेब त्यांना रणरागिणी याच नावाने संबोधित करायचे. त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेना महिला आघाडीला बळ मिळाले असून पक्षाचे विचार महिलांपर्यंत रूजवण्यासाठी त्यांचा निश्चित फायदा होईल. असं पक्ष प्रवेशाच्या वेळी शिंदेंनी म्हटलं.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ‘त्या’ चार कार्यकर्त्यांना अखेर न्याय मिळाला, तडीपारचा आदेश कोर्टाने केला रद्द
दरम्यान, मीनाताई कांबळी यांच्यासह शिवडी येथे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज भालेकर यांनी आणि सामाजिक चळवळीत काम करणारे अनेक कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार संजय शिरसाट, शिवसेना प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, शिवसेना सचिव सुशांत शेलार, माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव, उपनेत्या कला शिंदे, शिवसेना प्रवक्ते संजीव भोर तसेच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेच्या शुभदिनी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रणरागिणी आणि उबाठा गटाच्या उपनेत्या मीना कांबळी यांनी #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून भावी सामाजिक आणि… pic.twitter.com/aCvgsyXCMC
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 18, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांचा दहशतवाद्यांना पाठींबा आहे का? खुलासा करावा”, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची मागणी
हेही वाचा…“कुठलाच ९६ कुळी मराठा कुणबी दाखला घेणार नाही”, नारायण राणेंच्या विधानानंतर वाद होण्याची शक्यता
हेही वाचा…ड्रग्ज प्रकरण..! “तुम्ही कुणाची चौकशी करणार, अगोदर तुम्हीच याचं उत्तर द्या, ?” अन् सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर पारा चढला
हेही वाचा…बावनकुळेंचं वक्तव्य, अन् दुसरीकडे काका-पुतण्यात झाली लढाई, पाहा नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…बारामती अॅंग्रो कंपनीचा लढा रोहित पवारांनी जिंकला, प्रदूण नियंत्रण मंडळाचे आदेश कोर्टाकडून रद्द