नागपूर : ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना एक महत्वाचा सवाल केला होता. २०२४ मध्ये तुम्हाला मुख्यमंत्री कोण हवा आहे? त्यावर सभागृहातून एकमुखाने देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस असा पुकारा आला असल्याचं बावनकुळेंनी सांगितलं. त्यावरून आता विरोधकांनी टोलेबाजी केली आहे. यातच आता काका पुतण्यामध्ये यावरून जोरदार शाब्दिक चकमक झाली आहे.
हेही वाचा…ड्रग्जप्रकरणाबाबत नाशकात ठाकरे गटाचा मोर्चा, दादा भूसेंचा राजीनामा मागणार
बावनकुळे यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी भाजपला टोला लगावला. अहो बावनकुळे साहेब देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पहिलं आमदार व्हावं लागेल. तुमच्याच पक्षाचे लोक नागपूरमध्ये निवडणुकीची वाट पाहत आहेत. असं म्हटलं. त्यावर आणि सध्या भाजपमध्ये असलेले अनिल देशमुख यांचे पुतणे आशिष देशमुख यांनी त्यावर रिट्विट केलं आहे.
हेही वाचा…आणखी एका मराठा बांधवाने आपले जीवन संपवले, मुंबईत ग’ळ’फा’स घेऊन केली आ’त्म’ह’त्या
अहो काका. म्हणत तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचा चिंता करू नका. ते पुन्हा विक्रमी मतांनी निवडून येतील. पण तुमचे भवितव्य काय? आठवते ना? २०१४ मध्ये तुमचा दारुण पराभव मीच केला होता ना ? २०१९ मध्ये मी लढलो असतो तर तुमची काय गत झाली असती? आता २०२४ मध्ये तुमचा पक्ष खरंच तुम्हाला उमेदवारी देणार आहे की तुमच्या मुलाला? एकदा पवार साहेबांच्या मनाला विचारुन बघा. असं म्हणत जोरदार टोला लगावला आहे.
अहो काका ……
मा. देवेंद्र जी फडणवीस यांची चिंता करू नका. ते पुन्हा विक्रमी मतांनी निवडून येतील.
पण तुमचे भवितव्य काय?
आठवते ना? २०१४ मध्ये तुमचा दारुण पराभव मीच केला होता ना ?
२०१९ मध्ये मी लढलो असतो तर तुमची काय गत झाली असती?
आता २०२४ मध्ये तुमचा पक्ष खरंच तुम्हाला… https://t.co/BzVoTCFt5s
— Dr. Ashishrao R. Deshmukh (@AshishRDeshmukh) October 19, 2023
READ ALSO :
हेही वाचा…बारामती अॅंग्रो कंपनीचा लढा रोहित पवारांनी जिंकला, प्रदूण नियंत्रण मंडळाचे आदेश कोर्टाकडून रद्द
हेही वाचा…“आघाडीत वादावादी होईल, घासाघिस होईल, पण उमेदवार देऊ,” पृथ्वीराज चव्हाणांचं लोकसभेबाबत मोठं विधान
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ‘त्या’ चार कार्यकर्त्यांना अखेर न्याय मिळाला, तडीपारचा आदेश कोर्टाने केला रद्द
हेही वाचा…चिठ्ठी लिहून मराठा बांधवाने संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहिली ‘मराठा आरक्षणा’ची तारिख
हेही वाचा…फडणवीसांच्या ‘महायुतीचा घटक पक्ष’ शरद पवारांच्या गळाला ? दिल्लीत मोठी खलबत्तं