नाशिक : राज्यात गेल्या काही दिवसापासून ललित पाटील ड्रग्ज प्रकरण चांगलचं गाजत आहे. या प्रकरणासंदर्भात नाशकातून ललित पाटील याचे बंधू भुषण पाटील याच्यासह दोन महिलांना अटक केली आहे. तर मंत्री दादा भूसे यांच्यावर या प्रकरणांवरून आरोप केले जात आहेत. यातच आता ठाकरे गटाकडून नाशकात ड्रग्ज प्रकरणावरून आंदोलन छेडलं आहे.
हेही वाचा…निष्ठावंत असायला हवा तर असा..! 40 वर्षापासून असलेल्या ‘या’ नेत्यांनी राजीनामा दिला, पण ठाकरे गटातच राहणार
प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्धाने पावन झालेल्या नाशिक शहरात मागील काही दिवसापासून ड्रग्जचं प्रकरण सुरू आहे. या सर्व घटनांची जबाबादारी स्विकारून दादा भूसे यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. परंतु ते देत नाहीत. याशिवाय ते नाशिकमधील जिल्ह्याअधिकाऱ्यांना धमकवत आहेत. परंतु याचा मोठा स्फोट होणार आहे. ड्रग्जच्या बाबत आम्ही नाशिकमध्ये जनजागृती केली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमध्ये प्रचंड जनसमुदायाच्या माध्यमातून मोर्चा काढणार आहोत. असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“ललित पाटीलचा फडणवीसांकडून मोहरा म्हणून वापर”, आतापर्यंत ७०० ते ८०० कोटींचं ड्रग्ज जप्त
नाशकात निघाणाऱ्या मोर्चात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह शालेय विद्यार्थी देखील सहभागी घेणार आहेत. यातच ड्रग्जबाबत आमच्याकडून पुरावा देण्याचं कारणच नाही. उलट पालकमंत्री म्हणून तुम्ही चांगलं काम केलं असतं तर अशी वेळ आली नसती. उलट नैतिक जबाबदारी समजून दादा भूसे यांन पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यायाला हवा. असंही बडगुजर यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…आणखी एका मराठा बांधवाने आपले जीवन संपवले, मुंबईत ग’ळ’फा’स घेऊन केली आ’त्म’ह’त्या
हेही वाचा…ड्रग्ज प्रकरण..! नाशकातून ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना अटक, राहण्यासाठी घेतले होते 25 लाख
हेही वाचा…अजित पवारांना मराठा समाजाने घातली बंदी तर शरद पवारांची होणार ग्रॅंड एंन्ट्री
हेही वाचा…ललित पाटीलने तोंड उघडलं तर कोण अडकणार ? राज्यातील ‘या’ नेत्यांची नावे हिटलिस्टवर
हेही वाचा…एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या..! रक्षा खडसे यांच्यासह कुटुंबाला १३७ कोटीची नोटीस, नेमकं प्रकरण काय आहे ?