मुंबई : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर अंधेरी कोर्टात आणण्यात आलं. त्यावेळी मी ससून मधून पळून गेलो नाही तर मला पळवून लावलं आहे. सगळं उघड सांगणार असं म्हणत ललित पाटील यांनी या प्रकरणात आणखी बड्या व्यक्तींचा हात असल्याचं संकेत दिले. त्यानंतर राज्यात विरोधी पक्षातील नेत्यांनी दोन मंत्र्यांवर आरोप केलेत. तर ललित पाटीलच्या चौकशीतून मोठं रॅकेट बाहेर येईल अन् यामधून अनेकांची तोंड बंद होणार असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. त्यामुळे आता ललित पाटील बोलला तर कोण अडकणार? याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.
हेही वाचा…शिंदे गटाचा २२ जागांवर दावा, फडणवीसांचं लोकसभा निवडणुकीबाबत मोठं विधान
ललित पाटील प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांनी तपास करावा, अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. तसेच ललित पाटील, भुषण पाटील याच्यासह ललित पाटीलच्या हाताला झटका देऊन मला पळवून गेला असा बनाव केलेला तो पोलिस, ससून प्रशासनाचे डीन, त्यांचे स्वीय सहाय्यक, सोबतच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, मंत्री शंभुराज देसाई यां सगळ्यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
हेही वाचा…केवळ संशयाच्या आधारावर ललित पाटीलला अटक, बरंच काही सांगायचंय, ” ललित पाटीलच्या वकिलाचं मोठं विधान
ललित पाटील प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल अन् यामध्ये जो दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल. सुषमा अंधारे यांना इतकी माहिती असेल तर त्यांनी संबंधित यंत्रणेकडे जाऊन माहिती द्यायला हवी. यांच्या पाठीमागे बोलविता धनी कोण आहे ? नुसत्या प्रसिध्दीच्या हवाव्यासापोटी बेशुट आरोप करीत आहेत. असं दादा भुसे यांनी सांगितलंय. सुषमा अंधारेंच्या विधानानंतर मला हसु आलं आहे. त्यांचं विधान हास्यस्पद असून त्यामध्ये तीळमात्र संबंध नाही. अशापद्धतीचं विधान करून माझी प्रतिमा समाजात खराब करण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असं शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे.
याप्रकरणात कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी देखील या प्रकरणात राजकीय हात असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी या प्रकरणात नाशिकच्या पालकमंत्र्याचा हात असल्याचा आरोप केला आहे. तसेच ललित पाटील जळगाव आणि धुळ्याला का आला ? त्याचा चाळीस गावाच्या एका व्यक्ती संबंध काय? याचीही चौकशी व्हावी असंही खडसे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…अत्यंत निकटवर्तीय महिला पदाधिकाऱ्यांनी रश्मी ठाकरेंची साथ सोडली, शिंदे गटात केला जाहीर प्रवेश
दरम्यान, ड्रग्स फ्री महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन जी परिषद झाली होती. त्या परिषदेत सगळ्या युनिट्सला ड्रग्सवर कंट्रोल ठेवलं पाहिजे आणि यातील नेक्सस शोधलं पाहिजे. अशा सूचना दिल्या होत्या. त्या माध्यमातून सगळे युनिट् कामाला लागले आहेत. याच माध्यमातून मुंबई पोलिसांना देखील नाशिक येथील कारखान्याची माहिती लागली आहे. त्यावर त्यांनी धाड टाकली आहे. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी देखील धाडी टाकल्या आहे. आता ललित पाटील हातामध्ये आला आहे. निश्चितपणे यातून मोठे नेक्सेस बाहेर येईल. ललित पाटीलच्या चौकशीमधून एक मोठ नेक्सस आता बाहेर येणार असून यातून अनेकांची तोंड बंद होणार आहे. तसेच ससून रूग्णालया असो किंवा अन्य काही सर्व प्रकाराची चौकशी सुरू आहे. यातून कोणालाही सोडलं जाणार नाही. असा इशाराही फडणवीसांनी दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या..! रक्षा खडसे यांच्यासह कुटुंबाला १३७ कोटीची नोटीस, नेमकं प्रकरण काय आहे ?
हेही वाचा…निष्ठावंत असायला हवा तर असा..! 40 वर्षापासून असलेल्या ‘या’ नेत्यांनी राजीनामा दिला, पण ठाकरे गटातच राहणार
हेही वाचा…“ललित पाटीलचा फडणवीसांकडून मोहरा म्हणून वापर”, आतापर्यंत ७०० ते ८०० कोटींचं ड्रग्ज जप्त
हेही वाचा…ठाकरे गटाच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या, इडीचं धाडसत्र सुरू, अनेक ठिकाणी छापेमारी
हेही वाचा…देवीच्या दारात खोटारडेपणा, रश्मी ठाकरेंच्या कार्यक्रमाच्या वेळी पंख, एसी बंद, ठाकरे गटाचा आरोप