जळगाव : राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अवैध गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी खडसे कुटुंबीयांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांच्या कुटुबीयांना १३७ कोटी रूपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे जळगावाच्या राजकारणात याची एकच चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…केवळ संशयाच्या आधारावर ललित पाटीलला अटक, बरंच काही सांगायचंय, ” ललित पाटीलच्या वकिलाचं मोठं विधान
मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत अवैध गौण खनिज उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांनीच या प्रकरणाबाबत तक्रार दाखल केली होती. सातोर शिवारात १ लाख १८ हजार ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन झाल्याचा आरोप तक्रारीत चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी एसआयटीसी स्थापना करून याचा तपास अन् चौकशी करून याचा अहवाल शासनाकडे सादर केला होता. त्यानंतर नोटीस बजावण्यात आली आहे.
हेही वाचा…अत्यंत निकटवर्तीय महिला पदाधिकाऱ्यांनी रश्मी ठाकरेंची साथ सोडली, शिंदे गटात केला जाहीर प्रवेश
एकनाथ खडसे यांच्यासह मंदाकिनी खडसे, रोहिणी खडसे आणि भाजपच्या खासदार रक्षा खडेसे यांनाही १३७ कोटी रूपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. यातच माझा आरोप खरा असल्यामुळे चौकशीसाठी एसआयटी नियुक्त करण्यात आली होती. आता एसआयटीची चौकशी पूर्ण झाली असून कारवाईला सुरूवात झाली आहे. लवकरच कारवाईबाबतचे पत्र आपल्या हातात पडेल अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिलीय.
READ ALSO :
हेही वाचा…निष्ठावंत असायला हवा तर असा..! 40 वर्षापासून असलेल्या ‘या’ नेत्यांनी राजीनामा दिला, पण ठाकरे गटातच राहणार
हेही वाचा…“ललित पाटीलचा फडणवीसांकडून मोहरा म्हणून वापर”, आतापर्यंत ७०० ते ८०० कोटींचं ड्रग्ज जप्त
हेही वाचा…ठाकरे गटाच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या, इडीचं धाडसत्र सुरू, अनेक ठिकाणी छापेमारी
हेही वाचा…देवीच्या दारात खोटारडेपणा, रश्मी ठाकरेंच्या कार्यक्रमाच्या वेळी पंख, एसी बंद, ठाकरे गटाचा आरोप
हेही वाचा…शिंदे गटाचा २२ जागांवर दावा, फडणवीसांचं लोकसभा निवडणुकीबाबत मोठं विधान