ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आज टेंभी नाका देवीची महाआरती केली. त्याआधी त्यांनी दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मात्र यावेळी रश्मी ठाकरे यांच्या कार्यक्रमाच्या वेळी पंखे आणि एसी बंद करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
हेही वाचा…ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात फडणवीसांचाही संबंध ? दादा भुसेंनंतर सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप
आज रश्मी ठाकरे यांनी ठाण्यातली टेंभी नाक्यातील देवीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत खासदार राजन विचारे, केदार दिघे आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. तसेच रश्मी ठाकरे यांनी देवीची आरती करून ओटीही भरली. मात्र यावेळी मंदिरात पंखे आणि एसी बंद करण्यात आल्याचं महिला पदाधिकाऱ्यांनी म्हटलं.
हेही वाचा…“ललित पाटीलला भरचौकात फाशी द्या,” कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकरांनी केली मागणी
दरम्यान, टेंभी नाक्याची देवी ही आनंद दिघे साहेबांची देवी म्हणून ओळखली जाते. जवळपास ४७ वर्षापासून याठिकाणी आंबाबाई देवीचा जागर होतो. जागर होत असताना ठाकरे कुटुंबीय पहिल्यापासून टेंभी नाक्यावर दर्शनासाठी येत आहे. दरवर्षीप्रमाणे येतात. तशा याही वर्षी देखील रश्मी ठाकरे आल्या होत्या. परंतु देवीच्या जवळ गेल्या. त्यावेळी तेथील कुलर, साऊंड सिस्टिम बंद केलेत. त्यांनी कितीही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी आमचा आवाज दाबला जाणार नाही. अस ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदे गटाचा २२ जागांवर दावा, फडणवीसांचं लोकसभा निवडणुकीबाबत मोठं विधान
हेही वाचा…केवळ संशयाच्या आधारावर ललित पाटीलला अटक, बरंच काही सांगायचंय, ” ललित पाटीलच्या वकिलाचं मोठं विधान
हेही वाचा…अत्यंत निकटवर्तीय महिला पदाधिकाऱ्यांनी रश्मी ठाकरेंची साथ सोडली, शिंदे गटात केला जाहीर प्रवेश
हेही वाचा…दिल्लीत अजितदादांची एन्ट्री, होम हवन करत नव्या कार्यालयाचं उद्घाटन, राष्ट्रवादीचं दोन कार्यालय
हेही वाचा…ललित पाटीलने सर्व आरोप फेटाळले, कोर्टात नेमकं काय काय घडलं ?