पुणे : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाला आता राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणासंदर्भात मंत्री दादा भुसे आणि शंभूराजे देसाई यांचा संबंध असून त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. तर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपच्या काही नेत्यांवर अप्रत्यक्षपणे आरोप केले आहेत. यातच आता ड्रग्ज प्रकरणातून मोठा रॅकेट बाहेर येणार असून यातून अनेकांची तोंड बंद होणार असल्याचा निर्वाणीचा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तर केवळ संशयाच्या आधारावर ललित पाटीलला अटक करण्यात आल्याचं वकिल राहुल कांबळे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…जरांगेंच्या अल्टिमेटला सहा दिवस बाकी, उपसमितीच्या बैठकीत मराठा समाजासाठी घोषणांची बरसात
ललित पाटीलला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. त्याला कोर्टाला बरचं काही सांगायचं असून सोमवारपर्यंत त्याला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे उद्याच मी जाऊन त्यांना पोलिस स्टेशनमध्ये भेटणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा जबाब मी नोंदवून घेणार आहे. सगळ्याच महत्वाचं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत. केवळ संशयाच्या आधारावर त्याला त्याठिकाणी पोलिसांनी अटक केलेल्या अशा प्रथमदर्शनी आम्हाला तरी वाटते. त्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही तयारी करत असल्याचं ललीत पाटील याचे वकिल राहुल कांबळे यांनी सांगितलंय.
हेही वाचा…“ससून मधून पळून गेलो नाही, मला पळवलं गेलं, सर्व सांगणार,” अटक केल्यानंतर ललित पाटलाचा व्हिडीओ व्हायरल
ड्रग्स फ्री महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन जी परिषद झाली होती. त्या परिषदेत सगळ्या युनिट्सला ड्रग्सवर कंट्रोल ठेवलं पाहिजे आणि यातील नेक्सस शोधलं पाहिजे. अशा सूचना दिल्या होत्या. त्या माध्यमातून सगळे युनिट् कामाला लागले आहेत. याच माध्यमातून मुंबई पोलिसांना देखील नाशिक येथील कारखान्याची माहिती लागली आहे. त्यावर त्यांनी धाड टाकली आहे. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी देखील धाडी टाकल्या आहे. आता ललित पाटील हातामध्ये आला आहे. निश्चितपणे यातून मोठे नेक्सेस बाहेर येईल. असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…अत्यंत निकटवर्तीय महिला पदाधिकाऱ्यांनी रश्मी ठाकरेंची साथ सोडली, शिंदे गटात केला जाहीर प्रवेश
हेही वाचा…दिल्लीत अजितदादांची एन्ट्री, होम हवन करत नव्या कार्यालयाचं उद्घाटन, राष्ट्रवादीचं दोन कार्यालय
हेही वाचा…ललित पाटीलने सर्व आरोप फेटाळले, कोर्टात नेमकं काय काय घडलं ?
हेही वाचा…ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात फडणवीसांचाही संबंध ? दादा भुसेंनंतर सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप
हेही वाचा…“ललित पाटीलला भरचौकात फाशी द्या,” कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकरांनी केली मागणी