नवी दिल्ली : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच महायुती सरकरामधील राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांनी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राज्यात आता नवी राजकीय गणितं जुळणार का ? याची चर्चा सुरू आहे. मागील काही दिवसापासून महादेव जानकर भाजपसह महायुतीतील पक्षांवर नाराज आहे. त्यांनी ही नाराजी उघड उघड बोलूनही दाखवली आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा…एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या..! रक्षा खडसे यांच्यासह कुटुंबाला १३७ कोटीची नोटीस, नेमकं प्रकरण काय आहे ?
महादेव जानकर यांनी दिल्लीत विमानतळावर शरद पवारांची भेट घेतली.यावर महादेव जानकर यांनीच या गोष्टीला दुजारो दिला आहे. परंतु ही भेट राजकीय नसून वैयक्तिक असल्याचं जानकर यांनी म्हटलं आहे. परंतु जेव्हा दोन राजकीय नेते भेटतात, तेव्हा राजकारणावर चर्चा केल्या जातात हे काही लपून राहिलं नाही. यातच राज्यात सध्या मराठा आरक्षणासोबत धनगर आरक्षण देखील गाजत आहेत. त्यामुळे धनगर समाजाचा नेता आपल्याकडे असावा, यासाठी शरद पवार तर प्रयत्न करत नसणार ना. अशी चर्चाही दुसऱ्या बाजूला सुरू आहे.
हेही वाचा…निष्ठावंत असायला हवा तर असा..! 40 वर्षापासून असलेल्या ‘या’ नेत्यांनी राजीनामा दिला, पण ठाकरे गटातच राहणार
भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून महादेव जानकर यांना ओळखण्यात येतं. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांची कायम साथ दिली आहे. गेल्या काही दिवसापासून भाजप आणि पंकजा मुंडे यांचं फारस काही चाललं नाहीय. यातच मागच्या काही दिवसापासून महादेव जानकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे शरद पवारांच्या भेटीमुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण जुळणार का ? याची चर्चा सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ड्रग्जप्रकरणाबाबत नाशकात ठाकरे गटाचा मोर्चा, दादा भूसेंचा राजीनामा मागणार
हेही वाचा…आणखी एका मराठा बांधवाने आपले जीवन संपवले, मुंबईत ग’ळ’फा’स घेऊन केली आ’त्म’ह’त्या
हेही वाचा…ड्रग्ज प्रकरण..! नाशकातून ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना अटक, राहण्यासाठी घेतले होते 25 लाख
हेही वाचा…अजित पवारांना मराठा समाजाने घातली बंदी तर शरद पवारांची होणार ग्रॅंड एंन्ट्री
हेही वाचा…ललित पाटीलने तोंड उघडलं तर कोण अडकणार ? राज्यातील ‘या’ नेत्यांची नावे हिटलिस्टवर