बीड : राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हल्ला करणारे अजून पोलिसांच्या हाती लागले नसून पोलिस त्याचा पुढील तपास करीत आहेत. मागील काही दिवसापासून परळीमध्ये गुंडाराज सुरू असल्याने एकच भीती निर्माण झाली आहे. या घटनेंवरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त करत पोलिसांवर देखील रोष दाखवला आहे.
हेही वाचा…ड्रग्ज प्रकरण..! “तुम्ही कुणाची चौकशी करणार, अगोदर तुम्हीच याचं उत्तर द्या, ?” अन् सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर पारा चढला
परळीमध्ये गेल्या काही दिवसापासून गुंडाराज सुरू आहे. काल राष्ट्रवादी कॅंग्रेसच्या सहदेव साथभाई, मोहन साळुंखे, प्रविण लोंढे या तीन कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले झाले आहेत. या हल्ल्यामध्ये त्यांच्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. परंतु पोलिसांनी या घटनेकडे गांभीर्याने बघितले नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…बावनकुळेंचं वक्तव्य, अन् दुसरीकडे काका-पुतण्यात झाली लढाई, पाहा नेमकं काय घडलं ?
या प्रकरणानंतर कोणत्याही आरोपीला अद्यापही अटक करण्यात आलं नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाला त्यांचे जबाब व्यवस्थिपणे नोंदिवले गेले आहे. परंतु जबाबाबत हल्लेखोरांवर गुन्हा देखील दाखल झाला नसून त्यांची एका दिवसात सुटका होईल. अशा पद्धतीने पोलिसांनी दाखल केला आहे. असंही आव्हाडांनी म्हटलंय.
हेही वाचा…बारामती अॅंग्रो कंपनीचा लढा रोहित पवारांनी जिंकला, प्रदूण नियंत्रण मंडळाचे आदेश कोर्टाकडून रद्द
दरम्यान, आज पुन्हा स्वप्नील पुजारी या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. त्यामध्ये त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. म्हणजे पोलिसांची भितीच निघून जाणार असेल तर समाजामधील अस्वस्थता कुठे जाईल याचा विचारही पोलिसांनी करावा. परळीमधील गुंडाराज संपवावा आणि ही राजकीय दादागिरी बंद करावीआम्ही लोकशाहीला मानणारे, संविधानाला मानणारे कार्यकर्ते आहोत. म्हणून आम्ही षंढ आहोत असं समजू नका. असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय.
गेल्या काही महिन्यापासून परळीमध्ये गुंडाराज सुरु आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहदेव साथभाई, मोहन साळुंखे, प्रविण लोंढे या तीन कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले झाले. या हल्ल्यामध्ये त्यांच्यावर गंभीर जखमा झाल्या. परंतु पोलिसांनी या घटनेकडे गांभीर्याने बघितले नाही. ना… pic.twitter.com/iJU2GLPhEg
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 20, 2023
READ ALSO :
हेही वाचा…आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय ‘या’ नेत्याला शिंदे गटात लागली लॉटरी, शिंदेंनी दिलं मोठं पद
हेही वाचा…“..त्यामुळेच एकनाथ खडसेंना मंत्रीपदावरून दूर गेले,” उदय सामंतांचं मोठं विधान
हेही वाचा…४५ वर्षापासून शिवसेनेत असलेली ”बाळासाहेबांची रणरागिणी” शिंदे गटात दाखल, शिंदेंनी दिलं थेट ‘नेते पद’
हेही वाचा…“शरद पवारांचा दहशतवाद्यांना पाठींबा आहे का? खुलासा करावा”, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची मागणी
हेही वाचा…“कुठलाच ९६ कुळी मराठा कुणबी दाखला घेणार नाही”, नारायण राणेंच्या विधानानंतर वाद होण्याची शक्यता