मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंत्राट भरतीची निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर जोरदार टिका केली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार दसऱ्यापासून युवा संघर्ष यात्रा काढणार आहे. तर उद्या नाशकात कंत्राटी भरतीवरून राष्ट्रवादी युवा सेना रेल्वे रोको आंदोलन करणार आहे. परंतु त्याआधीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली आहे.
हेही वाचा…“शरद पवारांचा दहशतवाद्यांना पाठींबा आहे का? खुलासा करावा”, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची मागणी
कंत्राटी भरतीच्या संदर्भात पहिला निर्णय राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसच्या सरकारमध्ये असतांना १३ मार्च २०१३ रोजी झाला होता. काॅंग्रेसचे नेते अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना २०१० साली पहिला जीआर काढण्यात आला होता. त्यानंतर आणखी एक जीआर ६ हजार पदांच्या भरतीचा काढण्यात आला. यामध्ये शिक्षक भरतीचा जीआर काढण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
हेही वाचा…“कुठलाच ९६ कुळी मराठा कुणबी दाखला घेणार नाही”, नारायण राणेंच्या विधानानंतर वाद होण्याची शक्यता
वाहनचालक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, विशेष शिक्षक, मोबाईल टीचर यांच्यासाठीही कंत्राटी जीआर काढण्यात आले आहे. तेव्हा काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. यातच मुख्यमंत्री असतांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सहीने आणि शरद पवार यांच्या आशीर्वादानं कंत्राटी भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे कंत्राच भरतीचं संपूर्ण पाप उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
हेही वाचा…ड्रग्ज प्रकरण..! “तुम्ही कुणाची चौकशी करणार, अगोदर तुम्हीच याचं उत्तर द्या, ?” अन् सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर पारा चढला
दरम्यान, कंत्राटी भरतीचं पाप ठाकरे आणि पवारांनी केलं आणि पुन्हा आत्ता तेच आंदोलन करत आहेत. मला कधी कधी वाटतं की यांना लाज शरम आहे का नाही ? यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी महाराष्ट्राची माफी मागणार आहे का? स्वत:चं पाप दुसऱ्याच्या माथी मारल्याबद्दल त्यांनी माफि मागितली पाहिजे. उबाठा आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे पाप आमच्या सरकारच्या माथ्यावर नकोय. म्हणून आम्ही हा जीआर रद्द करतोय असंही फडणवीसांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार गटातील नेत्यांसोबत वाकृयुद्ध, पण तरीही अजित पवारांनी रोहित पवारांचं ‘ते’ केलं काम
हेही वाचा…परळीत गुंडाराज..! राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांवर जीवघेणा ह’ल्ला, आरोपी फरार
हेही वाचा…आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय ‘या’ नेत्याला शिंदे गटात लागली लॉटरी, शिंदेंनी दिलं मोठं पद
हेही वाचा…“..त्यामुळेच एकनाथ खडसेंना मंत्रीपदावरून दूर गेले,” उदय सामंतांचं मोठं विधान
हेही वाचा…४५ वर्षापासून शिवसेनेत असलेली ”बाळासाहेबांची रणरागिणी” शिंदे गटात दाखल, शिंदेंनी दिलं थेट ‘नेते पद’