पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील राजकीय नेत्यांनी मोठी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. यातच सुरूवातीपासून भाजपच्या हिटलिस्टवर असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत मोठी घडामोड घडतांना दिसत आहे. बारामती जिंकण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले असताच मनसेनेही या लोकसभा मतदारसंघात उडी घेतली आहे.
हेही वाचा…४५ वर्षापासून शिवसेनेत असलेली ”बाळासाहेबांची रणरागिणी” शिंदे गटात दाखल, शिंदेंनी दिलं थेट ‘नेते पद’
बारामती लोकसभा जिंकण्यासाठी भाजपने केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या लोकसभा मतदारसंघाकडे डोळा लावून बसले आहेत. अजित पवारांच्या महायुतीत सामील झाल्याने आता महायुतीला बारामती लोकसभा जिंकणे सोप्प झालं असल्याचं म्हणण्यात येत आहे. परंतु शरद पवारांमुळे अडचण निर्माण होऊ शकते. हे ओळखून भाजपसह महायुतीच्या पक्षांनी जोरदार रणनिती आखली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“शरद पवारांचा दहशतवाद्यांना पाठींबा आहे का? खुलासा करावा”, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची मागणी
बारामती हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सुरूवातीपासून या मतदारसंघावर राष्ट्रवादीचं वचर्स्व राहिलं आहे. खासदार सुप्रिया सुळेंचा पराभव करणं राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षाला जड जाण्याची शक्यता आहे. परंतु याच बारामती लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने माजी नगरसेवक वसंत मोरे यांची निवड केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील वसंत मोरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तेब केला असल्यांचं संकेत दिले आहे. त्यामुळे मनसे भाजपने यासाठी छुपी युती करून सुप्रिया सुळे यांची मतं खायला राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना उभं केलं आहे. अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
हेही वाचा…“कुठलाच ९६ कुळी मराठा कुणबी दाखला घेणार नाही”, नारायण राणेंच्या विधानानंतर वाद होण्याची शक्यता
दरम्यान, बारामती लोकसभेची जबाबदारी मनसेने वसंत मोरे यांच्याकडे सोपवली आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी बारामतीत लोकसभा मतदारसंघ कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांचं भरभरून कौतूक केलं आहे. आजचा कार्यक्रम फक्त कार्यालयाच्या उद्घाटनाचा आहे. वसंत मोरे अतिशय शिस्तबद्ध आहे. बारामती अजित पवार सापडावा.. मला माहिती नाही आमच्याकडे पण अजित पवार आहेत. पण आयुष्यात मला कधी काका म्हणू नको अशी मिश्किल टिप्पणीही राज ठाकरे यांनी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कंत्राटी भरतीचा जीआर रद्द..! फडणवीसांची मोठी घोषणा, ठाकरे अन् पवारांवर केलेत गंभीर आरोप
हेही वाचा…अजित पवार गटातील नेत्यांसोबत वाकृयुद्ध, पण तरीही अजित पवारांनी रोहित पवारांचं ‘ते’ केलं काम
हेही वाचा…परळीत गुंडाराज..! राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांवर जीवघेणा ह’ल्ला, आरोपी फरार
हेही वाचा…आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय ‘या’ नेत्याला शिंदे गटात लागली लॉटरी, शिंदेंनी दिलं मोठं पद
हेही वाचा…“..त्यामुळेच एकनाथ खडसेंना मंत्रीपदावरून दूर गेले,” उदय सामंतांचं मोठं विधान