नवी मुंबई : आगामी महिन्यात देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजणार आहे. छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि मिझोरम राज्यात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकांसाठी भाजपसह देशातील विरोधी पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच भाजपने मिझोरम विधानसभा निवडणुकीसाठी ४० जणांची फौज उतरवली आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांचा देखील समावेश आहे.
हेही वाचा…भाजप-मनसेची बारामतीत मोठी खेळी, सुप्रिया सुळेंची मतं खायला ‘या’ फायर ब्रॅंड नेत्याला उमेदवारी देणार ?
मिझोरममध्ये विधानसभेच्या ४० जागांसाठी येत्या ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर या निवडणुकीची मतमोजणी येत्या ३ डिसेंबर रोजी होणार आहे. त्याआधी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी, स्मती इराणी आदी नेत्यांचा समावेश आहे.
हेही वाचा…कंत्राटी भरतीचा जीआर रद्द..! फडणवीसांची मोठी घोषणा, अन् पवारांवर केलेत गंभीर आरोप
दरम्यान, यातच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ४० विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी भाजपचे ४० नेते ४० ठिकाणी प्रचार सभा घेणार आहे. प्रचारासाठी देशातील कार्यकर्त्यांची निवड करून त्यांना भाजपकडून प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. या राज्यात सध्या मिझो राष्ट्रीय आघाडीचे अध्यक्ष झोरमथंगा मुख्यमंत्री म्हणून आहेत. त्यामुळे आता याठिकाणी सत्ता आणण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का तर ठाकरेंना मोठा दिलासा, राहुल नार्वेकरांनी घेतला मोठा निर्णय
हेही वाचा…“ड्रग्ज माफिया ललित पाटील त्यावेळी शिवसेनेचा नाशिक शहराचा प्रमुख होता,” फडणवीसांनी एक मोठा बॉम्ब फोडला
हेही वाचा…“बक्कळ कमाईचा डाव पुरता फसलाय,” कंत्राट भरतीचा जीआर शासनाकडून रद्द
हेही वाचा…Video..! “बाळासाहेबांची डरकाळी, ठाकरी बाणा,” शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टिझर पाहलात का ?
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ नेत्यांनी सुषमा अंधारेंना दिली धमकी, फडणवीसांचा उल्लेख करत अंधारेंचा जोरदार पलटवार