जळगाव : अगदी कमी वेळेतच सुषमा अंधारे यांनी आपली छाप शिवसेनेत सोडली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर त्या प्रत्येक सभेतून तूटून पडत आहेत. यातच जळगाव येथे त्यांची महाप्रबोधन सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधत त्यांची मिमिक्री देखील सुषमा अंधारे यांनी केली.
गुजरात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर..! भाजपची सत्ता पणाला, तर केजरीवाल धमका करणार?
महाविकास आघाडी सरकार असताना भाजप नेते किरीट सोमय्यांनी आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लावले. मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर भाजपचे नेते शांत झालेत. भाजपने ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. त्या नेत्यांनी शिंदे- भाजप युतीला पाठींबा जाहीर केला. यामध्ये शिवसेनेच्या अनेक मोठ्या नेत्यांचा सहभाग होता. मात्र त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या शांत झालेत. त्यावरून त्यांना सुषमा अंधारे यांनी डिवचलं आहे.
“बच्चू कडू माझ्यासाठी छोटा विषय आहे, ते जर दम देत असेल तर..; 2 दिवसात राणांचा रवैया बदलला
सुषमा अंधारे यांनी सोमय्या स्टाईने त्यांची मिमिक्री केली. त्या म्हणाल्या की, ज्या भावना गवळी इकडे असताना माफिया होत्या. त्या तिकडे गेल्यानंतर मोदींच्या बहिणबाई कशा झाल्या. यशवंत जाधव तिकडे गेल्यावर स्वच्छ कसे झालेत. प्रताप सरनाईकांच्या बाबतीतही तसंच झालं. मग भाजपकडे वाशिंग मशिन आहे का ? की तिकडे गेल्यावर स्वच्छ होतात. असा टोला देखील त्यांनी लगावला.
शिवसेना उपनेत्या @andharesushama ताई यांनी किरीट सोमय्याला त्याच्याच पद्धतीने विचारले प्रश्न….?? (1/2)@AUThackeray @AhirsachinAhir pic.twitter.com/6tuiI7RwQ3
— Shilpa Bodkhe – प्रा.शिल्पा बोडखे (@BodkheShilpa) November 3, 2022
Read also
- “दादा तुम्ही फक्त पुण्याचे मंत्री नाही, महाराष्ट्राकडेही लक्ष्य द्या”
- “आता पोलिस भरती, महिनाभरात ग्रामविकास विभागाची भरती”; फडणवीसांनी विरोधकांची केली बोलती बंद
- “बेरोजगारांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे शिंदे-फडणवीसाचं काम”
- “कडू झालेले तोंड गोड करण्यासाठी सपन प्रकल्पाला मंजूरी.!” काॅंग्रेसने बच्चू कडूंना डिवचलं
- नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्राला मोठं गिप्ट..! तब्बल 2 लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर