पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ३०३ कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे उपस्थित होते. मात्र दादा तुम्ही फक्त पुण्याचेच मंत्री नाहीत तर संपुर्ण महाराष्ट्राचे मंत्री आहात. त्याकडेही लक्ष्य द्या. असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत.
“बच्चू कडू माझ्यासाठी छोटा विषय आहे, ते जर दम देत असेल तर..; 2 दिवसात राणांचा रवैया बदलला
चंद्रकांत पाटील यांच्याकडे अगोदर भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री त्याचबरोबर पुण्याच्या पालकमंत्र्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु मागील काही विकासकामांचा विचार केला तर चंद्रकांत पाटील पुण्याकडे जास्त लक्ष्य देतांना दिसत आहेत. कारण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील आपल्या मतदारांना वळवण्याकरीता अनेक उपक्रम आपल्या मतदार संघात राबवत आहेत.
तू लाव टिकली, परंपरेच्या बाजारात अक्कल आम्ही विकली; सुळेंचा भिडेंना खोचक टोला
मुळचे कोल्हापुरचे असलेले चंद्रकांत पाटलांना पुण्यातून विधानसभेसाठी तिकीट देण्यात आले. यावरून पुण्यातील भाजपमध्ये अंतर्गत वाद देखील दिसून आले. यातच भाजपमध्ये दोन गट पडलेले दिसून आले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील कोथरूड मतदार संघातून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांचं पुण्याकडे जास्तच लक्ष्य लागून आहे. यावरून बाहेरील नागरिक चंद्रकांत पाटलांना डिवचतांना दिसत आहेत.
“महिलांचा अपमान केल्याप्रकरणी भिडेला अटक करा;” राष्ट्रवादीची मागणी
दरम्यान, शासनाने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कामांना यापूर्वी स्थगिती दिली होती. प्रत्येक कामांची पालकमंत्र्यांनी तपासणी करून मंजुरी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पालकमंत्री पाटील यांनी वार्षिक आराखड्यात समाविष्ट प्रत्येक कामांची माहिती घेतली. जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने आवश्यक असलेल्या ३०३ कोटींच्या कामांना यावेळी मंजुरी देण्यात आली. सर्व विकासकामे नियोनबद्ध पद्धतीने वेळेत पूर्ण करण्यात यावेत आणि कामांचा दर्जा चांगला राहील याकडेही विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
Read also
- “आता पोलिस भरती, महिनाभरात ग्रामविकास विभागाची भरती”; फडणवीसांनी विरोधकांची केली बोलती बंद
- “बेरोजगारांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे शिंदे-फडणवीसाचं काम”
- “कडू झालेले तोंड गोड करण्यासाठी सपन प्रकल्पाला मंजूरी.!” काॅंग्रेसने बच्चू कडूंना डिवचलं
- नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्राला मोठं गिप्ट..! तब्बल 2 लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर
- गुजरात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर..! भाजपची सत्ता पणाला, तर केजरीवाल धमका करणार?