मुंबई : देशातील प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांची म्हणजेच इंडियाची बैठक मुंबईत होत असून अनेक नेते मुंबईत दाखल होत आहेत. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केलीय. त्यावरून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पलटवार केला आहे.
हेही वाचा…“इंडियाची बैठक झाली अन् गॅसच्या किमंती कमी झाल्या, कारण केंद्र सरकारचं गॅसवर,” ठाकरेंचा हल्लाबोल
मुंबईत होणारी इंडियाची बैठक नाही तर घमेंडियाची बैठक आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तुमच्या याच टोळीने शंभर कोटी वसुली केली, करोना काळात कोट्यवधीची कंत्राट घशात घातली. मृतदेहांसाठीच्या बॅगही त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. तुम्ही लालूप्रसाद यादवांच्या माध्यमातून मोदीजींच्या ‘नरड्यावर बसण्याचं स्वप्न’ बघा. पण जनता तुमच्या छाताडावर बसेल. तुम्ही मोदीजींना जेवढ्या शिव्या द्याल जनता मोदीजींवर तेवढं जास्त प्रेम करेल. असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…2024 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी विरूद्ध अरविंद केजरीवाल, इंडियाच्या बैठकीपुर्वी आपची मोठी घोषणा
दरम्यान, बावनकुळेंच्या टिकेला आंबादास दानवेंनी जोरदार टिकास्त्र सोडलंय. ज्या माणसाकडे पक्ष नाही, सत्ता नाही, त्यावर असले हातभर निबंध लिहिणे तुमच्यातील भीतीची ग्वाही देते. उद्धव ठाकरे का इतना डर. बढीया है. असं म्हणत दानवेंनी बावनकुळेंना डिवचलं..तसेच मणिपूरच्या भूमीवरची हिंसा अद्याप थांबलेली नाही. कालच दोन जणांचे बळी गेल्याचे वृत्त आहे. बदनामी विरोधकांच्या बैठकीने नाही तर निर्दोष लोकांच्या मृत्यूने होत असते. मणिपूरमुळे तुमचा उद्धार जगभर आणि देशांतर्गत सुरूच असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
ज्या माणसाकडे पक्ष नाही, सत्ता नाही, त्यावर असले हातभार निबंध लिहिणे तुमच्यातील भीतीची ग्वाही देते..
उद्धवसाहेब ठाकरेजी का इतना डर.. बढीया है!
— Ambadas Danve (@iambadasdanve) August 31, 2023
READ ALSO :
हेही वाचा…स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निर्णय पुन्हा लांबणीवर, कोर्टाकडून ‘ही’ नवीन तारिख जाहीर
हेही वाचा…“देव आमचा जुगार खेळतो, भारतरत्न परत करा” , तेंडूलकराच्या घरासमोर बच्चू कडूंचं जोरदार आंदोलन
हेही वाचा…“अजित दादांच्या दादागिरीला ठाण्याच्या भाईंचा लगाम..!” वडेट्टीवारांनी अजित पवारांना डिवचलं
हेही वाचा…“बंडखोरांना आगामी निवडणुकीत जागा दाखवली जाईल,” शरद पवारांनी अजित पवार गटाविरूद्ध दंड थोपटलं
हेही वाचा…पंतप्रधानपदाची इंडियाकडे अनेक पर्याय, पण भाजपात मोदींशिवाय पर्याय आहेत का ?