मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर बीएमसीने कारवाई केल्यावर कंगना अधिकच संतापली आहे. यानंतर कंगनाने सरकारला खडेबोल सुनावले आहेत . कंगनाच्या मागे भाजप असून तिने वापरलेले शब्द भाजपचेच असल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे.
‘कोणी पूर्वीचा अट्टल ड्रगअॅडिक्ट मुंबईला पाकिस्तान म्हणून महाराष्ट्राचा अपमान करतय, स्वतःच्या कार्यालयाला राम मंदिर म्हणतय तरीही भाजपा समर्थन करते? हा तर महाराष्ट्रासकट भगवान श्रीरामाचाही अपमान आहे तोंड कोणाचेही असले तरी शब्द भाजपाचेच आहेत, अशा शब्दात सावंतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
काल भाजपा संचालित एक चॅनेलने काही लोकांना जमवून निदर्शने करवणे, मोदी सरकारने तातडीने संरक्षण देणे, यातून सत्तापिपासू भाजपाचे षडयंत्र साफ दिसत आहे. महाराष्ट्र द्रोही भाजपलाला महाराष्ट्र माफ करणार नाही. गद्दार भाजपा महाराष्ट्रातून साफ होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, अशी टीका सावंत यांनी भाजपवर केली आहे.
कोणी पूर्वीचा अट्टल ड्रगअॅडिक्ट मुंबईला पाकिस्तान म्हणून महाराष्ट्राचा अपमान करतय, स्वतःच्या कार्यालयाला राम मंदिर म्हणतय तरीही भाजपा समर्थन करते? हा तर महाराष्ट्रासकट भगवान श्रीरामाचाही अपमान आहे. तोंड कोणाचेही असले तरी शब्द भाजपाचेच आहेत.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 10, 2020