नवी दिल्ली : गेली अनेक महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून आहेत. या ऐतिहासिक आंदोलनाला आता 26 मे ला 6 महिने पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता संयुक्त किसान मोर्चाकडून 26 मे रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला देशभरातील 12 विरोधी पक्षांकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
गेल्या 6 महिनांपासून देशभरातील विविध राज्यांमधील शेतकरी केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर किमान 40 संघटनांचा संघ असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने 26 मे रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. या दिवशी देशभरात ‘काळा दिवस’ पाळला जाणार आहे.
We extend our support to the call given by the Samyukta Kisan Morcha (SKM) to observe a countrywide protest day on May 26, marking the completion of six months of the heroic peaceful Kisan struggle.
– Joint Statement by 12 Major Opposition Parties pic.twitter.com/pfIByd3vjI
— Congress (@INCIndia) May 23, 2021
काँग्रेसने ट्विट करत यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, संयुक्त किसान मोर्चाने 26 मे रोजी देशभरात जाहीर केलेल्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा देतो. त्या दिवशी शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला 6 महिने पूर्ण होत आहेत.
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस, जेडीएस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, डीएमके, झारखंड मुक्ती मोर्चा, जेकेपीए, समाजवादी पार्टी, आरजेडी, सीपीआय आणि सीपीआय-एम या पक्षांचा समावेश आहे.
Read Also :
- ‘बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राने संकटग्रस्त कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसली’
- ‘राज्याच्या हितासाठी कटूपणा घ्यायची माझी तयारी’
- ‘कोकणात वादळ 4 तास थांबलं, मुख्यमंत्री 3 तासही थांबले नाहीत’
- ‘मोदी आणि भाजपच्या अहंकारामुळे देशाची स्मशानभूमी झाली’
- ‘गंगेत तरंगणाऱ्या शेकडो प्रेतांनी हिंदुस्थानचा भेसूर चेहरा जगासमोर आणला’