अहमदनगर : कर्जत आणि जामखेड या दोन्ही ठिकाणाच्या शासकीय रूग्णालयाचं काम अर्धवट होऊन निधीअभावी ठप्प झालं आहे. अजित पवार राज्याचे अर्थमंत्री आहेत. मात्र अजितदादांच्या खात्यांवर देवेंद्र फडणवीस अंकूश ठेवत असल्याने रूग्णालयाचं काम अधुर राहिलं असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे कर्जत आणि जामखेड मतदारसंघातील आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
हेही वाचा…शिंदे गटाचा दसरा मेळावा अडचणीत..!शिंदेंना रावण दहनाचा कार्यक्रम तिथीनुसार का नकोय? मंत्र्यांकडून मंडळांवर दबाव
शासकीय रूग्णालयाच्या अर्ध्या कामासाठी सरकारकडून निधी दिला जात नसल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. अजित पवार राज्याचे अर्थमंत्री आहेत. परंतु त्यांच्या खात्यावर देवेंद्र फडणवीस अंकूश ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. उपचाराअभावी एखाद्याचा बळी गेल्यास त्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री घेणार का ? असा सवालही रोहित पवारांनी केलाय.
हेही वाचा…तेलंगणाच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या ‘या’ दोन नेत्यांचा कस लागणार ? पक्षानी सोपवली मोठी जबाबदारी
तसेच राजकारण तर आपण नेहमीच एकमेकांच्या विरोधात करीत आहोत. पण ते विचारांचं आणि तत्वाचं असायला हवं. राजकारणापायी सामान्य माणूस भरडला जाऊ नये, हे आपल्यासारख्या मोठ्या नेत्याला सांगण्याची वेळ यावी, यापेक्षा दुर्दैव दुसरं असू शकत नाही. असं रोहित पवारंनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकांसाठी आघाडीसोबत आले पाहिजे,” काॅंग्रेसच्या बड्या नेत्यांनी दिले युतीचे संकेत
दरम्यान, अजित पवार यांनी नेमही पक्षविरहित विकासाचं राजकारण केलं आहे हे सर्वांना माहिती आहे. राज्याचे अर्थमंत्री म्हणून दादांनी आतापर्यंत आपल्या मतदारसंघासाठी १८२७.६५ कोटी रूपयाचा विकास निधी दिला आहे. एकूण विकास निधी पैक्षी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून १०६ कोटी, जिल्ह्यास्तरीय २५ कोटी रूपयांचा निधी कर्जत जामखेड मतदारसंघातील आरोग्य सेवा सुधारावी म्हणून दिला आहे. मंत्रिमंडळात दादांवर अंकूश ठेवावं असा कोणताही नेता नाही. अजितदादा संधी पाहून राजकारण करत नाहीत ते नेहमी विकासांचं आणि विचाराचं राजकारण करतात. असा पलटवार अजित पवार गटाचे नेते सुरज चव्हाण यांनी रोहित पवारांवर केला आहे.
रोहीत दादा अजित दादांनी नेहमी पक्षविरहित विकासाचं राजकारण केलं आहे हे आपल्यालाही माहित आहे.राज्याचे अर्थमंत्री म्हणून दादांनी आतापर्यंत आपल्या मतदारसंघासाठी 1827.65 कोटी रुपयाचा विकास निधी दिला आहे.एकूण विकास निधी पैकी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 106 कोटी,जिल्हास्तरीय 25 कोटी… https://t.co/DleZi9Ldxh
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) October 22, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! खोके सरकारची थंडी बिअर योजना! बिअरची विक्री वाढविण्यासाठी सरकारने स्थापन केली समिती
हेही वाचा…विवस्त्र महिलेचा धावतांना व्हिडीओ व्हायरल, भाजप आमदाराच्या पत्नीवर गुन्हा दाखल
हेही वाचा…नेत्यांना मराठा समाजाकडून गावबंदी, शिंदेंच्या ‘या’ मंत्र्यांना गावकऱ्यांनी अक्षर:श पळवून लावलं
हेही वाचा…मराठा समाजाबद्दल वक्तव्य करणं रामदास कदमांना भोवलं, ठाकरेंच्या शिवसैनिकाने चांगलचं सुनावलं
हेही वाचा…शाब्दिक फसवाफसवी करून सरकार आंदोलकांच्या भावनांशी खेळतंय का ? २४ तासात जाहिरातीची भाषा बदलली