मुंबई : मागील काही दिवसापासून इंडिया आघाडीत सामील करून घेण्याची मागणी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लावून धरली आहे. मात्र अद्यापही त्यांना महाविकास आघाडीकडून हिरवा कंदील देण्यात आला नाही. यातच आज प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईच्या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतल्याने चर्चांना उधाण आहे. खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याने आंबेडकर महाविकास आघाडीसोबत येणार का ? अशा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर काॅंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…राज्यात नवी राजकीय समीकरणं जुळणार? प्रकाश आंबेडकरांनी घेतली शरद पवारांची भेट
आज मुंबईत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेली प्रकाश आंबेडकर व शरद पवारांची भेट ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे. महाविकास आघाडीची पुढची सकारात्मक पावले पडण्याच्या दृष्टीने हा एक शुभ संकेत आहे. माझी व्यक्तीगत इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी आणि महाविकास आघाडीने आगामी निवडणुकीमध्ये एकत्र आले पाहिजे. आज भलेही एका कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा आंबेडकरांच्या भाषेमध्ये कॉफी पिण्याच्या निमित्ताने एकत्र आल्याचे संकेत त्यांनी दिले; जे काही असेल ते सकारात्मक आहे आणि आगामी काळामध्ये यातून एक संवाद सुरू होईल. पुढील काळात वंचित आघाडीला महाविकास आघाडी सोबत घेण्याच्या दृष्टीने काही चांगली सकारात्मक पावले पडावीत. असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा…“युवा संघर्ष यात्रेला यश, सरकारकडून दखल, अजितदादा तिथे असते तर..,” रोहित पवारांनी फडणवीसांना दिले प्रत्युत्तर
दरम्यान, डॉ.बाबासाहेब आंडेकर यांचं ”प्रोल्बेम ऑफ रूपी” या पुस्तकाला शंभर वर्ष पुर्ण होत आहे. त्यानिमित्ताने एक प्रवक्ता म्हणून प्रकाश आंबेडकर यांना बोलण्यात आलं होतं. तसेच या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. फक्त सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यासोबत कॉफी घेतली अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिली.
READ ALSO :
हेही वाचा…वाद वाढला…! “कोकणातील एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही”,नारायण राणेंनंतर शिंदे गटाच्या नेत्याचा दावा
हेही वाचा…“..म्हणूनच राष्ट्रवादीच्या सर्व पदाचा राजीनामा दिला”,भुजबळांचा गड गडगडला, खंदे समर्थकाने दिला राजीनामा
हेही वाचा…“प्रकाश आंबेडकर जर आघाडीसोबत येत असतील तर…,”काॅंग्रेसच्या बड्या नेत्यांचं मोठं विधान
हेही वाचा…मोठी बातमी…! मराठा समाजाचे नेते विनायक मेटेंच्या पुतण्याची आ’त्म’ह’त्या’, राज्यात एकच खळबळ
हेही वाचा…“बॉम्बस्फोटच्या वेळी दाऊद भाजपचा अध्यक्ष..,” उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिलं जोरदार प्रत्युत्तर