बीड : मागील काही दिवसापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील ठिकठिकाणी सभा घेत आहे. मराठा आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला अल्टिमेटम देखील दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला मराठा बांधव आत्महत्या करतांना दिसत आहे. यातच आता मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांच्या पुतण्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा…” एकनाथ शिंदे गट आणि अजित दादा गटाला भाजपात विलीन करण्याची वेळ येणार”
मराठा समाजाचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांचे पुतणे सचिन मेटेने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगाव येथील घटना असून सचिन मेटे यांनी गळफास का घेतला ? याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सचिन मेटे यांनी गळफास घेतल्याने त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा…खंदे समर्थकाने भुजबळांची साथ सोडली, एकेकाळी भाजपला निवडणुकीत दिला होता मोठा झटका
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मागील काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील जाहीर सभा घेत आहेत. यामधून मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करू नका असं आवाहन करीत आहे. यातच जालन्यातील सुनील कावळे या ४५ वर्षीय व्यक्तीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतांना आता सचिन मेटे या मराठा बांधवांनी आत्महत्या केल्याने याची जोरदार चर्चा सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“बॉम्बस्फोटच्या वेळी दाऊद भाजपचा अध्यक्ष..,” उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिलं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…राज्यात नवी राजकीय समीकरणं जुळणार? प्रकाश आंबेडकरांनी घेतली शरद पवारांची भेट
हेही वाचा…“युवा संघर्ष यात्रेला यश, सरकारकडून दखल, अजितदादा तिथे असते तर..,” रोहित पवारांनी फडणवीसांना दिले प्रत्युत्तर
हेही वाचा…तब्बल ३०० कार्यकर्त्यांना घेऊन भाजपच्या ‘या’ नेत्याने गाठलं मातोश्री, ठाकरेंनी शिवबंधन बांधून दिला प्रवेश
हेही वाचा…“मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला, पण पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही”