नाशिक : महायुती सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असलेले जयदत्त होळकर यांनी छगन भुजबळ यांची साथ सोडली आहे. जयदत्त होळकर हे मंत्री छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक होते. त्यामुळे याची चर्चा आता राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे.
हेही वाचा…“४० मतदारसंघ, ४० प्रचारसभा अन् ४० नेत्यांची फौज,” भाजपने ‘या’ राज्यात आखली मोठी रणनिती
मागील काही दिवसापासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहेत. ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यावर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी विरोध दर्शविला आहे. याचाचं कारण म्हणून जयदत्त होळकर यांनी मुंबई कृषी उत्तन्न बाजार समिती संचालक पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…“ड्रग्ज माफिया ललित पाटील त्यावेळी शिवसेनेचा नाशिक शहराचा प्रमुख होता,” फडणवीसांनी एक मोठा बॉम्ब फोडला
२०२० मध्ये झालेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत जयदत्त होळकर यांची मोलाची भूमिका होती. २०२० ला झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला दणदणीत विजय मिळवून दिला होता. विशेष करून या निवडणुकीत भाजपला खातंही खोलता आलं नव्हतं. ६ महसुल आणि ४ व्यापासी मतदारसंघात भाजपला एकही विजय न मिळवून देण्यात जयदत्त होळकर यांची मोठी भूमिका होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीने निर्विवाद वचर्स्व ठेवलं होतं.
हेही वाचा…एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का तर ठाकरेंना मोठा दिलासा, राहुल नार्वेकरांनी घेतला मोठा निर्णय
दरम्यान, पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. यानंतर राज्यात अनेक नेत्यांनी पक्षप्रवेश केलेत. मात्र काही निष्ठावंत कार्यकर्ते अजूनही शरद पवार गटात कायम आहेत. यातच छगन भुजबळ अजित पवार गटात गेल्याने काही ठिकाणी भुजबळ समर्थकांनी शरद पवार गटात राहण्याचा निर्णय घेतला. यातच आता जयदत्त होळकर हे भुजबळांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.
READ ALSO :
हेही वाचा…“ललित पाटील प्रकरणात राऊतांना बेड्या ठोका, पक्षाच कवचकुंडल ललित पाटीलला कुणी दिलं?”
हेही वाचा…“शरद पवार, ठाकरे अन् पटोले यांनी नाक घासून माफी मागावी अन्यथा..”, कुणी आणि का दिला इशारा ?
हेही वाचा…महापालिका ताब्यात घेण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली, माजी नगरसेवकांची बोलवली महत्वाची बैठक
हेही वाचा…“अल्टिमेटम संपला पण शिंदे समितीला पुरावे भेटेना, समितीने मागितली ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत, जरांगे पाटील मोठा निर्णय घेणार ?
हेही वाचा…विलास लांडेंचं अपयश अजित गव्हाणेंच्या माथी, अजित पवारांच्या कार्यक्रमाला रिम्म सभागृह रिकामं