मुंबई : ललित पाटील ड्रग्जप्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी नाशकात मोर्चा काढला. या मोर्चात त्यांनी महायुती मधील मंत्री दादा भूसे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. तसेच दादा भूसे मंत्री असतांनाच ललित पाटीलला मातोश्रीवर आणलं होतं. त्यामुळे या प्रकरणावरून दादा भूसे यांची चौकशी करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच ललित पाटील शिवसेनेचा नाशिक शहर प्रमुख होता. या विधानावर देखील राऊतांनी पलटवार केला आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊतांचीच चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा…एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का तर ठाकरेंना मोठा दिलासा, राहुल नार्वेकरांनी घेतला मोठा निर्णय
ललित पाटलाचे धागेदोरे संजय राऊत यांच्यापर्यंत आहेत की नाही, याचा तपास केला पाहिजे. कारण याच ललित पाटीलला उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधून नाशिक शहाराचा प्रमुख केला. अन् संजय राऊत आंदोलन करण्याची भाषा करीत आहे. खरं संजय राऊतांनाच बेड्या ठोकायला पाहिजेत. कारण त्यांनी त्याला शहर प्रमुख केला. पक्षाच कवचकुंडल ललित पाटील याला कुणी दिलं? त्याला जर पक्षाचं कवचकुंडल दिलं नसतं तर त्यांनी हा धंदा केला नसता. असं संजय गायकवाड यांनी म्हटलं.
हेही वाचा…“ड्रग्ज माफिया ललित पाटील त्यावेळी शिवसेनेचा नाशिक शहराचा प्रमुख होता,” फडणवीसांनी एक मोठा बॉम्ब फोडला
तर संजय राऊत उत्तर महाराष्ट्राचे नेते असतांना नाशिकच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. त्यात ड्रग्स तस्कर ललित पाटीलला उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेण्याचं काम संजय राऊत यांनी केले आहे. असं दादा भूसे यांनी सांगितलं आहे.
ललित पाटीलचं पालनपोषण केलं ते दादा भूसे आज नाशिकचे पालकमंत्री आहेत. ललित पाटीलल मातोश्रीवर घेऊन आलेत.त्याचे फोटो देखील आहेत. त्यावेळी दादा भूसे मंत्री होते. त्यामुळे या प्रकरणाबाबत दादा भूसे यांची चौकशी करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. याप्रकरणाची तुमच्याकडे माहिती नसेल तर आम्ही यंत्रणेला माहिती देण्यास तयार आहोत. गृहमंत्री देवेंद्र फणवीस देखील यामध्ये फेल आहेत. १९९२ च्या स्फोटावेळी दाऊद भाजपचा अध्यक्ष होता असं म्हणू नका ? ललित पाटील हा शिवसेनेचा शहर प्रमुख होता या फडणवीसांच्या विधानावर संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवार, ठाकरे अन् पटोले यांनी नाक घासून माफी मागावी अन्यथा..”, कुणी आणि का दिला इशारा ?
हेही वाचा…महापालिका ताब्यात घेण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली, माजी नगरसेवकांची बोलवली महत्वाची बैठक
हेही वाचा…“अल्टिमेटम संपला पण शिंदे समितीला पुरावे भेटेना, समितीने मागितली ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत, जरांगे पाटील मोठा निर्णय घेणार ?
हेही वाचा…विलास लांडेंचं अपयश अजित गव्हाणेंच्या माथी, अजित पवारांच्या कार्यक्रमाला रिम्म सभागृह रिकामं
हेही वाचा…“४० मतदारसंघ, ४० प्रचारसभा अन् ४० नेत्यांची फौज,” भाजपने ‘या’ राज्यात आखली मोठी रणनिती