मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलचा पेटला असून मनोज जरांगे पाटलांनी सरकारला २२ ऑक्टोंबर पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. २२ ऑक्टोंबरपर्यंत सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही तर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असा इशारा दिला होता. यातच आता मराठा आरक्षणासाठी स्थापन केलेल्या समितीला मराठा आरक्षणाबाबत पुरेशी माहिती मिळाली नसल्याने यासाठी सरकारकडून मुदतवाढ देण्याची मागणी केली जाणार आहे. आता यावर मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…Video..! “बाळासाहेबांची डरकाळी, ठाकरी बाणा,” शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टिझर पाहलात का ?
मराठा आरक्षण संदर्भात सरकारने शिंदे समिती स्थापन केली होती. मात्र मराठवाड्यात कुणबी मराठा जातीचे पुरावे म्हणावे तसे पुरावे मिळाले नसल्याने समितीने सरकारकडे ३० नोव्हेंबर पर्यंत मुदत मागितली आहे. त्यामुळे आता ३० नोव्हेंबर नंतर काय निर्णय होणार ते त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ नेत्यांनी सुषमा अंधारेंना दिली धमकी, फडणवीसांचा उल्लेख करत अंधारेंचा जोरदार पलटवार
शिंदे सरकारने मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही पुरावे मागितले होते. यामध्ये काही जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्याने यासंदर्भात दस्तऐवज दिले होते. मात्र त्यामधून फक्त ५ हजार पुरावे मिळाले होते. इतक्या पुराव्यात निर्णय घेणं शक्य नसल्याने शिंदे समितीने मराठवाड्याचा दौरा केला होता. परंतु हवे असलेले पुरावे अद्यापही मिळाले नाहीत. त्यामुळे शिंदे समितीने राज्य सरकारकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. याबाबत सरकारने देकील सकारात्मकता दाखविली असून ३० नोव्हेंबर पर्यंत मुदत दिली आहे.
हेही वाचा…भाजप-मनसेची बारामतीत मोठी खेळी, सुप्रिया सुळेंची मतं खायला ‘या’ फायर ब्रॅंड नेत्याला उमेदवारी देणार ?
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आज देखील पुण्यातील राजगुरूनगर येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत देखील मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षणा देण्याची मागणी केली आहे. तसेच सरकारने जर आमची मागणी मान्य केली नाही तर मराठ्यांचं पुढचं आंदोलन झेपणार नाही. असा इशाराही जरागेंनी सरकारला दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…विलास लांडेंचं अपयश अजित गव्हाणेंच्या माथी, अजित पवारांच्या कार्यक्रमाला रिम्म सभागृह रिकामं
हेही वाचा…“४० मतदारसंघ, ४० प्रचारसभा अन् ४० नेत्यांची फौज,” भाजपने ‘या’ राज्यात आखली मोठी रणनिती
हेही वाचा…एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का तर ठाकरेंना मोठा दिलासा, राहुल नार्वेकरांनी घेतला मोठा निर्णय
हेही वाचा…“ड्रग्ज माफिया ललित पाटील त्यावेळी शिवसेनेचा नाशिक शहराचा प्रमुख होता,” फडणवीसांनी एक मोठा बॉम्ब फोडला
हेही वाचा…“बक्कळ कमाईचा डाव पुरता फसलाय,” कंत्राट भरतीचा जीआर शासनाकडून रद्द