पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर आता पुणे महापालिका निवडणुकीसाठी त्यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. एकेकाळचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जाणारी पिंपरी चिंचवड महापालिकेत पुन्हा सत्ता प्रास्थापित करण्यासाठी अजित पवारांनी विशेष लक्ष घातलं आहे. तसेच अजित पवारांचा पुणे महापालिकेवर देखील लक्ष असून आज पुण्यात अजित पवारांनी माजी नगरसेवकांची बैठक बोलावली आहे.
हेही वाचा…“बक्कळ कमाईचा डाव पुरता फसलाय,” कंत्राट भरतीचा जीआर शासनाकडून रद्द
आगामी काही महिन्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकांसोबत महापालिकांच्या निवडणुका देखील होणार आहे. यातच पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली आहे. आज पुण्यात अजित पवारांनी माजी नगरसेवकांची बैठक बोलवली असून या बैठकीत नगरसेवकांची कामे मार्गी लावण्यासाठी अजित पवारांनी पुढाकार घेतला आहे. पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आता थेट महापालिका आयुक्तांना सोबत घेऊन अजित पवार बैठक घेणार आहेत.
हेही वाचा…Video..! “बाळासाहेबांची डरकाळी, ठाकरी बाणा,” शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टिझर पाहलात का ?
दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष फुट आणि राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अजित पवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दोन्ही गटांत विखुरले गेले आहेत. यातच माजी नगरसेवकांना सोबत घेऊन, त्यांची राहिलेली कामे मार्गी लावण्यासाठी अजित पवारांनी धडका सुरू केला आहे. अलिकडेच अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्यामुळे आता अजित पवार पुन्हा नव्याने पिंपरी चिंचवड तसेच पुणे महापालिकेत सत्ता स्थापन करणार का ? त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अल्टिमेटम संपला पण शिंदे समितीला पुरावे भेटेना, समितीने मागितली ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत, जरांगे पाटील मोठा निर्णय घेणार ?
हेही वाचा…विलास लांडेंचं अपयश अजित गव्हाणेंच्या माथी, अजित पवारांच्या कार्यक्रमाला रिम्म सभागृह रिकामं
हेही वाचा…“४० मतदारसंघ, ४० प्रचारसभा अन् ४० नेत्यांची फौज,” भाजपने ‘या’ राज्यात आखली मोठी रणनिती
हेही वाचा…एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का तर ठाकरेंना मोठा दिलासा, राहुल नार्वेकरांनी घेतला मोठा निर्णय
हेही वाचा…“ड्रग्ज माफिया ललित पाटील त्यावेळी शिवसेनेचा नाशिक शहराचा प्रमुख होता,” फडणवीसांनी एक मोठा बॉम्ब फोडला