मुंबई : येत्या दसराच्या दिवशी शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. त्याची जय्यत तयारी शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. मात्र याच मैदानावर दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम एक दिवस अगोदर घेण्यात यावे, अशी सुचना मंडळाना देण्यात आल्या आहेत. यावर आता महाराष्ट्र रामलिला मंडळाचे उपाध्यक्ष संदीप शुल्का यांनी भाष्य केले आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! मराठा समाजाचे नेते विनायक मेटेंच्या पुतण्याची आ’त्म’ह’त्या’, राज्यात एकच खळबळ
आझाद मैदानवर रामलिला दहनचा कार्यक्रम मागील ३८ वर्षापासून सुरू आहे. याच आझाद मैदानावर साहित्य मंडळाचा कार्यक्रम देखील मागील ४० वर्षापासून सुरू आहे. यातच राज्यातील पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रावण दहनाचा कार्यक्रम महापालिकेची परवानगी दिल्यानंतर घेण्यास सांगितला आहे.
हेही वाचा…“बॉम्बस्फोटच्या वेळी दाऊद भाजपचा अध्यक्ष..,” उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिलं जोरदार प्रत्युत्तर
पुढे बोलतांना संदीप शुल्का म्हणाले की, आझाद मैदानावर आम्ही नाटकाच्या स्वरूपात करीत आलो आहे आणि तो कार्यक्रम तिथीनुसार झालं पाहिजे. परंतु आता मंत्री आम्हाला त्यादिवसाच्या अगोदर घेण्यास सांगत आहेत. परंतु काही मंडळ मंत्री दबाव टाकत असल्याचं सांगत आहे. यामुळे आमच्या मंडळात आता फुट पडली आहे. यातील एक मंडळ क्रॉस मैदानावर घेणार आहेत.
हेही वाचा…राज्यात नवी राजकीय समीकरणं जुळणार? प्रकाश आंबेडकरांनी घेतली शरद पवारांची भेट
मागील काही वर्षापासून सुरू असलेलं रावण दहन त्याच मैदानावर झालं पाहिजे. अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करीत आहोत. शिवतीर्थावर दसरा मेळावा होत असेल तर याच मैदानावर रावण दहन का करू नये. असंही संदीप शुल्का यांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…तेलंगणाच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या ‘या’ दोन नेत्यांचा कस लागणार ? पक्षानी सोपवली मोठी जबाबदारी
हेही वाचा…“प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकांसाठी आघाडीसोबत आले पाहिजे,” काॅंग्रेसच्या बड्या नेत्यांनी दिले युतीचे संकेत
हेही वाचा…वाद वाढला…! “कोकणातील एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही”,नारायण राणेंनंतर शिंदे गटाच्या नेत्याचा दावा
हेही वाचा…“..म्हणूनच राष्ट्रवादीच्या सर्व पदाचा राजीनामा दिला”,भुजबळांचा गड गडगडला, खंदे समर्थकाने दिला राजीनामा
हेही वाचा…“प्रकाश आंबेडकर जर आघाडीसोबत येत असतील तर…,”काॅंग्रेसच्या बड्या नेत्यांचं मोठं विधान